मुंबई : मी जर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोललो नाही तर मोठे पवार साहेब विरोधी पक्षनेते पद काढून घेतील अशी भिती असावी. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात टिका करण्याची ताई आणि दादांमध्ये जी स्पर्धा लागलेली आहे. त्यावरून मला एकच डायलॅाग आठवतोय. दया, कुछ तो गडबड है…!, असा टोला नरेश म्हस्के यांनी पवार कुटुंबावर लगावला आहे.
“तुम्ही गोधडीत नव्हता तेव्हापासून आम्ही..”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
अजित पवार हे महाराष्ट्रातील फार मोठं नेतृत्व आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं. त्यांच्या आयुष्यात एकदा ही संधी चालून आली होती. मात्र राष्ट्रवादीचे जास्त संख्येने आमदार असतानाही मोठ्या पवारसाहेबांनी ती संधी काँग्रेसला दिली. त्यानंतर त्यांनी एकदा पहाटे शपथविधी करुन उपमुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पवारसाहेबांनी त्यांचा डाव उलटवून लावला. त्यामुळे मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता आलं नाही याची खंत त्यांच्या मनात आहे, अशी घणाघाती टिका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी विरोधीपक्षनेते अजित पवार यांना लगावला आहे.
“मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव”; केंद्रीय मंत्री अमित शहाचं मराठीत सुचक ट्विट
सर्वसामान्य घारतील कार्यकर्तां, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला ही सल त्यांना बोचत असावी. शिंदे साहेब वर्षानुवर्षे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी गणपतीला जातात. म्हणुन त्या श्रद्धेचं राजकारण करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. म्हणुन ते टिका करत आहेत, असही नरेश म्हस्के म्हणाले.
Read also
- “आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक माना अन्..”; फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आव्हान
- “तुम्ही BMC साठी 135 चे टार्गेट ठेवलं, मी तुम्हाला 150 नगरसेवककांचे टार्गेट देतो”; अमित शाह
- “उद्धव ठाकरेंना जमिन दाखवण्याची वेळ आलीय”; अमित शहांचा शिवसेनेवर हल्लाबोल
- “पार्टटाईम, इतिहासकार, पवार पट्टशिष्य, ब्रिगेड आधारस्तंभ आव्हाड आता पार्टटाईम अर्थशास्त्री”
- “मराठी पोरांना वडापाव विकायला कोणी लावले..?”सामनाच्या टिकेला भाजपचा सवाल