ठाणे : कुठली तरी जागा बघून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळावा घ्यावा. सगळ्यांना मेळावा घेण्याचा अधिकार आहे. आमचा मेळावा आम्ही घेतला असता. मात्र आमचा मेळावा नागपूरमध्ये असतो. नाहीतर आम्ही मुंबईमध्ये दसरा मेळावा घेतला. त्यांनी घ्यायला काहीही हरकत नाही. बघू कोणाचा मेळावा मोठा होईल, अशी मिश्किल टिप्पणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.
“मराठी पोरांना वडापाव विकायला कोणी लावले..?”सामनाच्या टिकेला भाजपचा सवाल
खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यास त्यांनाच परवानगी मिळाली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी कुठेही दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही, असा टोला रामदास आठवले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
“तुम्ही गोधडीत नव्हता तेव्हापासून आम्ही..”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
मेजॉरिटीची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने त्यांना परवानगी द्यावी. मागील वेळी भाजप आणि आरपीआय एकत्र असताना 82 जागी निवडून आणल्या. त्यामुळे मेजॉरिटीपैकी 114 जागा निवडून आणण्यामध्ये आपल्याला काही अडचण येणार नाहीत, अस मत आठवलेंनी व्यक्त केलं आहे.
“मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव”; केंद्रीय मंत्री अमित शहाचं मराठीत सुचक ट्विट
मनसेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोबत घेण्याची अजिबात गरज नाही. राज ठाकरेंना घेतले तर भाजपचे नुकसान होऊ शकते. उत्तर भारतीयांची मते आहेत, गुजराती मते आहेत, दक्षिण भारतीय नागरिकांची मते आहेत. ही मते आपल्यासा मिळणार नाहीत. त्यामुळे आपला तोटा होण्याची शक्यता आहे. मनसेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोबत घेण्याची आवश्यकता नाही, कारण रिपब्लिकन पक्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपसोबत आहे, असही आटवले म्हणाले.
Read also
- “दया, कुछ तो गडबड है”; नरेश म्हस्केंनी अजित पवारांना डिवचलं
- “आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक माना अन्..”; फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आव्हान
- “तुम्ही BMC साठी 135 चे टार्गेट ठेवलं, मी तुम्हाला 150 नगरसेवककांचे टार्गेट देतो”; अमित शाह
- “उद्धव ठाकरेंना जमिन दाखवण्याची वेळ आलीय”; अमित शहांचा शिवसेनेवर हल्लाबोल
- “पार्टटाईम, इतिहासकार, पवार पट्टशिष्य, ब्रिगेड आधारस्तंभ आव्हाड आता पार्टटाईम अर्थशास्त्री”