मुंबई : उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिलेला आहे. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा. भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. राजकारणात काहीही करा, पण धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावे, असं वक्तव्यं करत अमित शहांंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अमित शहांच्या या टिकेला शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे.
“पार्टटाईम, इतिहासकार, पवार पट्टशिष्य, ब्रिगेड आधारस्तंभ आव्हाड आता पार्टटाईम अर्थशास्त्री”
कोण कोणाला धोका देतंय, कोणाला खोके देतंय,कोणाचे बोके पळवतंय हे सर्वांना माहित आहे. तसेच तुम्ही काय आम्हाला जमीन दाखवताय आम्ही जमिनीवरच आहोत. तुम्हीच आसमानात आहात त्यांना आम्ही जमिनीवर आणू. धोके कोण कोणाला देतं हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना माहीत आहे, असं शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
“मराठी पोरांना वडापाव विकायला कोणी लावले..?”सामनाच्या टिकेला भाजपचा सवाल
मुंबईकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना पहिले शाखाप्रमुख भेटतात. कोण कोणाला धोका देतंय, कोणाला खोके देतंय, कोणाचे बोके पळवतंय हे दिसतंय. तुमचे मनसुबे सर्वांना कळाले आहेत. स्थानिक पक्षाला नेस्तनाबूत करून एकच पक्ष..हेच मनसुबे आहेत. तुम्ही काय आम्हाला जमीन दाखवताय. आम्ही जमिनीवरच आहे. तुम्ही आसमानात आहात, आम्ही तुम्हाला जमिनीवर आणू, असा टोला पेडणेकरांनी भाजपला लगावला आहे.
“तुम्ही गोधडीत नव्हता तेव्हापासून आम्ही..”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
सोबतच, उद्धव ठाकरेंवरील टिका सहन करणार नाही. शिवसेनेला कोणीच संपवू शकत नाही, तुम्ही नष्ट व्हाल पण शिवसेना संपणार नाही. ते काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच त्यांना जमिन दाखवू. अमित शहा यांनीच शब्द फिरवला. शहा यांच्यासारख्या व्यक्तिने खोटे बोलणं चुकीचं आहे, असा टेला शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.
Read also
- “शिवसेना, शिंदे गट की मनसे, बघू कोणाचा मेळावा मोठा होतो”
- “दया, कुछ तो गडबड है”; नरेश म्हस्केंनी अजित पवारांना डिवचलं
- “आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक माना अन्..”; फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आव्हान
- “तुम्ही BMC साठी 135 चे टार्गेट ठेवलं, मी तुम्हाला 150 नगरसेवककांचे टार्गेट देतो”; अमित शाह
- “उद्धव ठाकरेंना जमिन दाखवण्याची वेळ आलीय”; अमित शहांचा शिवसेनेवर हल्लाबोल