भंडारा : भंडारा जिल्ह्यात मन सुन्न करणारी घटना घडली असून, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शिशु केअर युनिटला आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 9, 2021
मुख्यमंत्र्यांनी या घटनेची माहिती मिळताच त्वरित राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांना देखील त्यांनी तपासाचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीमुळे नवजात बाळकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. धुरामुळे गुदमरून मृत्यू नवजात चिमुकल्यांचा मृत्यू झाला.
Read Also :
- मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय पुढील आठवड्यात ? राज्य सरकारचे संकेत
- धक्कादायक! भंडाऱ्यात सरकारी रुग्णालयात आग लागल्याने 10 बाळांचा मृत्यू
- ‘अशोक चव्हाण यांचे मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे अज्ञान’
- ‘बाळासाहेब म्हणायचे आम्ही औरंग्याची नाही, संभाजी महाराजांची औलाद आहोत’
- ‘त्या’ घटनेबाबत रामदास आठवले थेट ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा करणार
- लस घेतलेल्यांची अशी पटणार ओळख, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती