नवी दिल्ली : आगामी काही महिन्यात देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. यातच आता मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील संभाव्य निकालांबाबत एक ओपिनियन पोल समोर आला असून, त्यामधून दोन्ही राज्यात आज निवडणुका झाल्यास कोण बाजी मारेल? याबाबतची आकडेवारी समोर आली आहे. टाईम्स नाऊ- नवभारत आणि ईटीजीने प्रसिद्ध केलेल्या या सर्व्हेनुसार मध्य प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाचा थेट विधानसभा अध्यक्षांनाच दणका, त्यामुळे रद्द करावा लागला परदेश दौरा
शिवराज सिंह चौहान यांचं नेतृत्व आणि केंद्रीय मंत्री आणि खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानंतरही विधानसभेची निवडणुक जड जाण्याची शक्यता आहे. तर काॅंग्रेस मध्य प्रदेशमध्ये बहुमतासह बाजी मारेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेतील आकडेवारीनुसार मध्यप्रदेशमध्ये निवडणुक झाल्यास भाजपला ४२.८ टक्के तर काॅंग्रेसला ४३.८ टक्के मत मिळू शकतात. तर इतर पक्षांच्या खात्यामध्ये १३.४० टक्के असून टक्केवारीचं जागांमध्ये रूंपातर केल्यास राज्य विधानसभेच्या २२९ जागांपैकी भाजपला १०२ ते ११० तर काॅग्रेसला ११८ ते १२८ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतर पक्षांच्या खात्यामध्ये २ जागा जाऊ शकतात.
हेही वाचा…“राजकीय द्वेषाचे बाप तुम्ही, जनता तुमच्यावरच.., “कोर्टाचा दिलासा मिळल्यानंतर रोहित पवारांचा रोख कुणाकडे ?
दरम्यान, राजस्थानमध्ये भाजप आणि काॅंग्रेसमध्ये अटीतटीची लढाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून याठिकाणी भाजप आणि काॅंग्रेसला प्रत्येकी ४२ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांमध्ये ०.६० टक्क्यांचं अंतर राहण्याची शक्यता असून इतर पक्ष आणि अपक्षांना १५ टक्के जागा मिळण्याची शक्यात आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण २०० जागांपैकी भाजपला ९५ ते १०५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काॅंग्रेसला ९१ ते १०१ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांच्या खात्यात ३ ते ६ जागा जाऊ शकतात.
READ ALSO :
हेही वाचा…शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारले जाणार, शिवछत्रपतींचे सुवर्ण मंदिर आणि जगातील सर्वात मोठा पुतळा
हेही वाचा…“आदिवासींमधून धनगर समाजाला आरक्षण दिल्यास आमदारकीचा पहिला राजीनामा देणार”, ‘या’ आमदाराने सरकारला दिला इशारा
हेही वाचा…मोठी बातमी…! एक देश, एक निवडणुक २०२४ ला नाही तर ‘या’ वर्षापासून लागू होणार, ? विधी आयोगाचा मोठा खुलासा
हेही वाचा…राज्यातील भाजपचे ‘हे’ दिग्गज आमदार लोकसभा लढणार, भाजप मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत
हेही वाचा…फडणवीसांची खेळी यशस्वी, तब्बल २० दिवसांपासून सुरू असलेले ओबीसी समाजाचे उपोषण मागे