जुन्रर : राज्यात मागील काही दिवसापासून आरक्षण मिळण्यासाठी विविध समाजाने उपोषण, आंदोलने आणि मोर्चे काढण्यास सुरूवात केली आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण त्याचबरोबर आता धनगर समाजाने आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे. आदिवासींमधून आरक्षण मिळावे, यासाठी धनगर समाजाने देखील उपोषण सुरू केले आहे. आदिवासींमधून धनगर समाजाला आरक्षण देऊ नये, यासाठी आता आदिवासी समाज देखील रस्त्यावर उतरला आहे. काल आणि आज जुन्नर येथे रस्ता रोको करत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली आहे.
हेही वाचा…लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट अन् भाजप भिडले, अन् शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यांनी थेट मशाल चिन्हच ठेवलं, एकच चर्चा
आदिवासी आरक्षण बचावासाठी काल प्रचंड आदिवासी समुदाय रस्त्यावर उतरला होता. यावेळी आदिवासी समाजाने रास्ता रोको करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. यावेळी असंख्य आदिवासी बांधवांनी जुन्नर शहारातून तहसिल कार्यालयापर्यंत रॅली काढली होती. जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सरकार धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या विरोध चेतवण्याचे काम करत असून राज्यातील सामाजिक शांतता बिघडविण्याचे काम करत असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव गणपत घोडे यांनी सांगितले.
हेही वाचा…मोठी बातमी..! मुंंबई हायकोर्टाचा रोहित पवारांना मोठा दिलासा, ‘या’ तारखेपर्यंत कारवाई न करण्याचे कोर्टाने दिले आदेश
दरम्यान, आदिवासी समाजाचे अधिकार व हक्क यांचे संरक्षण व्हावे, यासाठी मी कटिबद्ध असून, राज्य सरकारने धनगर समाजाला आरक्षण दिल्यास आदिवासी समाजाचा आमदार म्हणून माझा पहिला राजीनामा असेल असे आमदार अतुल बेनके यांनी सकल आदिवासी समाजाच्या वतीने जुन्नर येथे आरक्षण बचाव आंदोलनावेळी बोलतांना जाहीर केली.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! एक देश, एक निवडणुक २०२४ ला नाही तर ‘या’ वर्षापासून लागू होणार, ? विधी आयोगाचा मोठा खुलासा
हेही वाचा…राज्यातील भाजपचे ‘हे’ दिग्गज आमदार लोकसभा लढणार, भाजप मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत
हेही वाचा…फडणवीसांची खेळी यशस्वी, तब्बल २० दिवसांपासून सुरू असलेले ओबीसी समाजाचे उपोषण मागे
हेही वाचा…ठाकरे गटाचा थेट विधानसभा अध्यक्षांनाच दणका, त्यामुळे रद्द करावा लागला परदेश दौरा
हेही वाचा…“राजकीय द्वेषाचे बाप तुम्ही, जनता तुमच्यावरच.., “कोर्टाचा दिलासा मिळल्यानंतर रोहित पवारांचा रोख कुणाकडे ?