मुंबई : राज्याचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही सभागृहात आमनेसामने येत आहेत. अलिकडेच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलचं धारेवर धरलं. तर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावरूनही विरोधकांनी जहरी टिका केली. यातच आता राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली आहे.
हेही वाचा…“राज्यात १४ मार्चला मोठा राजकीय भुंकप”, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा
एकनाथ खडसे सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत. यातच आता त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या विधान परिषद गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुख्यप्रतोदपदी शशिकांत शिंदे तर प्रतोदपदी अनिकेद तटकरे यांच्या नावाची घोषणा उपसभापती निलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात केली. राष्ट्रवादीकडून त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्रही देण्यात आले आहेत.
हेही वाचा..शेतकरी हीच आमची जात, जात विचारून शेतकऱ्यांना खते काय देताय? अजित पवारांचा संतप्त सवाल
दरम्यान, एकनाथ खडसे यांना विधीमंडळाचा दिर्घ अनुभव आहे. सुरूवातीला त्यांनी भाजपमध्ये असतांना विरोधी पक्षनेत्याचीही जबाबदारी पार पडली आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. अन् राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. आता त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे.
Read also
- हेही वाचा…“खेडच्या विराट सभेतील ‘उद्धव’ दर्शनानंतर भाजपने हिंस्र नखं बाहेर काढली”
- हेही वाचा..सोमय्यांना जोर चा झटका, फासे पलटले, मुश्रीफांवरील आरोप भोवले, चौकशीचे दिले आदेश
- हेही वाचा..“शरद पवारांनी महाविकास आघाडीकडून बाहेर पडावं,” रामदास आठवले
- हेही वाचा..“बच्चू कडूंची गद्दारी पक्षासोबत होऊ शकते, सर्व सामान्यांशी नाही”
- हेही वाचा…नाना पटोलेंना काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणार? काय म्हणाले शिवाजीराव मोघे ?