मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्हा संदर्भात त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र हसन मुश्रीप यांच्यावर सातत्याने आरोप करणाऱ्या भाजपचे नेते किरीट सोमय्यांना मोठा झटका मिळाला आहे.
हेही वाचा..“आपल्या अन्नामध्ये कांद्याचा खर्च किती? हा प्रश्न संसदेत मांडणार”, शरद पवार
मागील काही दिवसापासून हसन मुश्रीप यांच्यावर आर्थिक भ्रष्टाचार प्रकरणी इडीचे धाड सत्र सुरू आहेत. आज देखील ईडीने त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली. यातच मुश्रीफ यांच्याविरोधात इडीने एफआयआर दाखल केली होती. ती एफआयआर रद्द करावी यासाठी हसन मुश्रीप यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टोने मुश्रीफांवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा..अब क्या होगा तेरा ‘अनिल परब’ ? किरीट सोमय्यांचं सुचक ट्विट
तर दुसरीकडे किरीट सोमय्यांनी कोर्टाची प्रत कशी मिळाली? असा सवाल करीत कोर्टोन किरीट सोमय्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता किरीट सोमय्या अडचणीत सापडले आहेत. हसन मुश्रीप प्रकरणाशी कोणताही संबंध नसतान किरीट सोमय्या यांना कोर्टोच्या आदेशांची तसेच एफआयआरची काॅपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते? असा सवाल कोर्टोने केला आहे.
Read also
- हेही वाचा..“शरद पवारांनी महाविकास आघाडीकडून बाहेर पडावं,” रामदास आठवले
- हेही वाचा..“बच्चू कडूंची गद्दारी पक्षासोबत होऊ शकते, सर्व सामान्यांशी नाही”
- हेही वाचा…नाना पटोलेंना काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणार? काय म्हणाले शिवाजीराव मोघे ?
- हेही वाचा…“राज्यात १४ मार्चला मोठा राजकीय भुंकप”, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा
- हेही वाचा..शेतकरी हीच आमची जात, जात विचारून शेतकऱ्यांना खते काय देताय? अजित पवारांचा संतप्त सवाल