पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने धक्का दिला आहे. ईडीने एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने एकनाथ खडसे यांची ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. लोणावळा आणि जळगाव इथल्या मालमत्तेचा समावेश आहे.
एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला भाजपचा विरोध, राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता
भोसरी एमआयडीसी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणात माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सक्तुवसुली संचलनालय अर्थात ईडीने नोटीस पाठवली होती. गेल्या महिन्यात खडसेंची तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली होती. पुण्यातील भोसरी MIDC भूखंड व्यवहार प्रकरणात जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावलं होतं. मंदाकिनी खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांना एका निवेदनाद्वारे १४ दिवसांची वेळ मागितली होती.
काय आहे प्रकरण?
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७५ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.
Read Also :
- भाजपला समर्थन करणाऱ्या ‘राष्ट्रवादी’ची एका रात्रीत पुन्हा पलटी; ॲमेनिटी स्पेसबद्दल भूमिका बदलली
- अटक, लीलावतीनंतर योद्धा पुन्हा मैदानात; नारायण राणेंची जन आशीवार्द आज रत्नागिरीतून सुरू
- सांगलीच्या पालकमंत्री पदावरून जयंत पाटलांना हटवा! भाजपची आक्रमक मागणी
- भावना गवळींना खावी लागणार जेलची हवा, भुजबळांनाही होणार ७ वर्षांची शिक्षा!
- एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला भाजपचा विरोध, राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता