मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत देशात सुरू असलेल्या लसीकरणाबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी 18 वर्षांवरील सगळ्यांना केंद्र सरकारकडून मोफत लस देणार असल्याची घोषणा करतानाच, केंद्र सरकार राज्यांना लस पुरवठा करणार असल्याचे सांगितले. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देणार असल्याची घोषणा केल्यानंतर आता भाजप नेते अवधूत वाघ यांनी ‘फुकट लसीकरणाची जबाबदारी बापानेच घेतली’, अशा आशयाचे ट्विट केले आहे. त्यांचे हे ट्विट व्हायरल होत असून, यासाठी त्यांना ट्रोल देखील केले जात आहे.
बाप तो बापच असतो.
शेवटी कोरोना लस फुकट देण्याची जबाबदारी बापानेच घेतली.@narendramodi— Avadhut Wagh अवधूत वाघ (@Avadhutwaghbjp) June 7, 2021
बाप तो बापच असतो. शेवटी कोरोना लस फुकट देण्याची जबाबदारी बापानेच घेतली, असे ट्विट केल्याने अवधूत वाघ यांना ट्रोल केले जात आहे.
दरम्यान, पंतप्रधानांचा मोफत लसीकरणाच्या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आभार मानले आहेत. या निर्णयामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.
Read Also :
- पुणे : रासायनिक कंपनीतल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर
- ‘आता आपल्याला लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊनही नको’
- ‘ ट्विटर मोदी सरकारसाठी राजकीय लढ्याचा आत्मा होता; पण…’
- ‘केंद्र सरकार ‘ब्लू टिक’साठी भांडतंय, लसीसाठी आत्मनिर्भर बना’
- ‘भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला, विरोध करणारे नतदृष्ट कोण?’