मुंबई : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार टिका टिप्पणी होतांना दिसत आहे. यातच देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या थपथविधीच्या गौप्यस्फोटावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती. त्यावर फडणवीस असत्याचा मार्ग घेऊन बोलत असल्याची टिप्पणी शरद पवारांनी दिली होती. त्यावरूनही भाजप आणि राष्ट्रवादीत खडाजंगी बघायला मिळाली. यातच आता पुन्हा एकदा भाजपने शरद पवार यांच्यावर टिप्पणी केली आहे.त्यावर राष्ट्रवादीने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…अजित पवार आणि उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली, राहुल कलाट्यांना वंचितचा पाठिंबा
भाजपा महाराष्ट्र या ट्विटवर आज शरद पवार यांचं कार्टून भाजपने ट्विट केलं आहे. त्यात शऱद पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. दुसऱ्यांची घरे फोडून स्वत:ची इमारत बांधणारे वास्तुशिल्पी..! असं म्हणत भाजपने शरद पवारांचा कार्टून ट्विट केला आहे. कार्टूनमध्ये इमारतीवर केंद्रीय मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, भावी पंतप्रधान. राजकीय घराणी फोडली, सहकारी साखर खारखान्यांवर कब्जा, शिक्षणसंस्था बळकावल्या, वसंतदादांच्या पाठीत खंजीर, य़शंवतरावांना दगा, असा उल्लेख करण्यात आला आहे.
हेही वाचा..““देवेंद्र फडणवीसांना कंड्या पिकवायला कसा वेळ मिळतो?”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना खोचक टोला
भाजपाने केलेल्या या ट्विटवर राष्ट्रवादीनेही प्रत्युत्तर दिलं आहे. राजकारणात विकासाचे मुद्दे उरले नाहीत की मोठ्या व्यक्तींच्या चारित्र्यहननाचे हेतूपुरस्सर काम भाजपकडून सुरू होते. केंद्रात पंडीत नेहरूंची बदनामी करून विकासाच्या मुद्यांवरून लक्ष हटवण्याचे मोदी मॉडेल अनेक वर्ष राबवले जातेय. हेच मॉडेल फडणवीस राज्यात राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. असंही त्यात म्हटलं आहे.
राजकारणात विकासाचे मुद्दे उरले नाहीत की मोठ्या व्यक्तींच्या चारित्र्यहननाचे हेतुपुरस्सर काम भाजपाकडून सुरू होते. केंद्रात पंडित नेहरूंची बदनामी करून विकासाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचे मोदी मॉडेल अनेक वर्ष राबवले जातेय. हेच मॉडेल फडणवीस राज्यात राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. https://t.co/q96UteB4sz
— NCP (@NCPspeaks) February 17, 2023
Read also
- हेही वाचा…सत्तासंघर्षांची सुनावणी आता मंगळवारी, पाच की सात घटनापीठाकडे जाणार की, निकाल लागणार ?
- हेही वाचा..“थोडी ताकद लावा.. मी बरा होऊन परत येईल, विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल;” खासदार गिरीश बापट
- हेही वाचा..“चिंचवडमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला…महाविकास आघाडी, अपक्षासह वंचितचेही तगडे आव्हान!
- हेही वाचा..“ऑक्सिजन सिलेंडरसह गिरीश बापट हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी मैदानात, टिळक, जगतापांची कार्यकर्त्यांना आठवण
- हेही वाचा..वंचितचा राहुल कलाट्यांना पाठिंबा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, की “आता उद्धव ठाकरे…”