कोल्हापूर : उत्तर विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने कोल्हापूर उत्तरेत पोटनिवडणूक होऊ घातली आहे. भाजपकडून माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे भाचे सत्यजित कदम हे मैदानात उतरले आहेत तर पालकमंत्री बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
“शेंडी जानव्याचे राजकारण नको”; विनायक राऊतांच्या वक्तव्यांवरून ब्राम्हण समाज आक्रमक
शिवसेना कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या बाबतीत कमालीची नाराज होती असं काहीसं चित्र सुरुवातीच्या काळात पाहायला मिळालं होतं. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत हजेरी दर्शविली होती. यावेळी पालकमंत्री बंटी पाटीलांसहित इतर नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीने अर्ज भरण्यावेळी कोणतेही शक्ती प्रदर्शन केले नाही. याउलट भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन करत विजयाचा शंखनाद केला आहे. भाजपकडून मोठ्या रॅलीचे नियोजन करण्यात आले होते.
माझ्या मुलीचा राजकारणाशी संबंध काय? तर ती आत्महत्या करेल; जितेंद्र आव्हाडांचं धक्कादायक वक्तव्य
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, महादेवराव महाडिक, समरजितसिंह घाटगे यांच्यासहित भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सत्यजित कदम यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यावेळी उपस्थिती दर्शविली. भाजपकडून करण्यात आलेले शक्ती प्रदर्शन हे विराट स्वरूपाचे होते.
रूपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा; राज्यात एकच चर्चा
चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक यांनी या वेळी बंटी पाटलांवर जोरदार टीका केली आणि शिवसेनेच्या खपल्या काढण्याचा प्रयत्न केला. धनंजय महाडिक हलगी हातात घेऊन विजय आमचाच म्हणत जोरदार बॅटिंग केली. आता भाजपने केलेले विराट शक्ती प्रदर्शन मतांद्वारे त्यांच्या पदरात पडणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also:
- धनंजय मुंडेंनी स्वत:ची सहा मुले तसेच अनेक बायकाही लपवल्या; करूणा मुंडेंचा गंभीर आरोप
- मुख्यमंत्र्याच्या मेहुण्यावर ईडीचं शुक्लकाष्ठ कायम; दुसऱ्या मालमत्तेवर देखील कारवाईचा बडगा
- “आम्ही कधीही पाठीवर वार करत नाही” काॅंग्रेसच्या प्रचारासाठी क्षीरसागरांनी भाजपवर तोप डागली
- “५० वर्षातील कामाचा हिशोब बिंदू चौकात काँग्रेसने द्यावा”; चंद्रकांत पाटलांचा बंटी पाटलांना टोला
- नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय? किरीट सोमय्यांचा नवा खुलासा