पुणे : राजीव गांधी सायन्स टेक्सनॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत उभारण्यात आलेल्या सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे गुरूवारी उद्धघाटन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी याचं स्वागत आणि त्यांच्या गाडीचं सारथ्य राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवारांनी केलं. आता यावर भाजप नेते अतुल भातखळ यांनी रोहित पवारांना यावरून टोला लगावला आहे.
“मुंबई महापालिका निवडणुकीत ‘मराठी मुलगी’ म्हणून प्रचार करणार”; नवनीत राणांनी पुन्हा थंड थोपटले
भाजपनेते अतुल भातखळकर यांनी रोहित पवार हे गौतम अदानीच्या गाडीचे सारथ्य करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर त्यांनी असं म्हटलं आहे की, अदानी आणि अंबानींवरून नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष्य करमाऱ्या काॅंग्रेस- राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांना आमदार रोहित पवा यांनी आपल्या कृतीनेच उत्तर दिले आहे. अदानी इतके मोठे आहेत की पवार त्यांच्यासाठी ड्रायव्हर सुद्धा बनू शकतात. किती हा नम्रपणा असंही त्यांनी म्हटलं आहे.
“मोदींपेक्षा कोणी मोठं नाही, त्यांनीच अजित दादांनी पहिले बोलावं असं म्हटलं होतं”
बारामतीत विज्ञान केंद्राचं उद्घाटन होत असून या कार्यक्रमाला शरद पवार आणि अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. त्यामुळे गौतम अदानीचं बारामती विमानतळावर रोहित पवारांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी स्वत: गाडी चालवत गौतम अदानींना केंद्रावर घेऊन आले. याचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
“मी आमदार नाही, मंत्री आहे, हा प्रश्न त्यांना विचारा”; बच्चू कडूंचं ‘त्या’ प्रश्नांवर तिखट उत्तर
गौतम अदानी आणि शरद पवार यावेळी एकाच मंचावर उपस्थित होते. यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून लुटारू आले की घोड्यावरून यायचे. आता गाड्यांमधून येतात. दोन लुटारू भाई भाई अवघा देश लुटून खाई, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. आता यावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
अदानी आणि अंबानींवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांना आमदार रोहित पवार यांनी आपल्या कृतीनेच उत्तर दिले आहे.
अदानी इतके मोठे आहेत की पवार त्यांच्यासाठी ड्रायव्हर सुद्धा बनू शकतात. किती हा नम्रपणा… pic.twitter.com/sdmvguBs37— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 16, 2022
Read also:
- “आता भाजपला कोणत्याही निवडणुकीत जिंकणं अशक्य”; नाना पटोलेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल
- अन् चक्क रोहित पवारांनी गौतम अदानीच्या गाडीचं सारथ्य केलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा
- “बारामती केंद्राला भेट द्याल तेव्हा विज्ञानाचे अनेक चमत्कार बघायला मिळतील”; शरद पवार
- “जलील यांनी सांगितल्यानंतर पंकजा मुंडे लगेचच पक्ष काढणार नाहीत, त्यांचा पक्ष विचार करेल” रावसाहेब दानवे
- “दोन लुटारू भाई भाई अवघा देश लुटून खाऊ”; शरद पवार, अदानी एकाच मंचावर, सदाभाऊंचा टोला