पुणे : राजीव गांधी सायन्स टेक्सनॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत उभारण्यात आलेल्या सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे गुरूवारी उद्धघाटन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी याचं स्वागत आणि त्यांच्या गाडीचं सारथ्य राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवारांनी केलं. आता यावर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी त्यांना टोला लगावला आहे.
“मी आमदार नाही, मंत्री आहे, हा प्रश्न त्यांना विचारा”; बच्चू कडूंचं ‘त्या’ प्रश्नांवर तिखट उत्तर
बारामतीत विज्ञान केंद्राचं उद्घाटन होत असून या कार्यक्रमाला शरद पवार आणि अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. त्यामुळे गौतम अदानीचं बारामती विमानतळावर रोहित पवारांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी स्वत: गाडी चालवत गौतम अदानींना केंद्रावर घेऊन आले. याचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
राजकीय मानपानाच्या नाट्यात देहू संस्थानची प्रतिमा मलीन; अजित पवार यांच्याकडून अद्यापही मौन
गौतम अदानी आणि शरद पवार यावेळी एकाच मंचावर उपस्थित होते. यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून लुटारू आले की घोड्यावरून यायचे. आता गाड्यांमधून येतात. दोन लुटारू भाई भाई अवघा देश लुटून खाई, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. आता यावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, बारामतीत उभारण्यात येत असलेल्या विज्ञान केंद्रात बौद्धिक कौशल्य व वैज्ञानिक जागृतीसाठी विविध प्रकल्प असणार आहेत. अनेक तज्ज्ञ व्यक्तींचे फन सायन्स शो, स्टॅडअप कॉमेडी, जादूचे प्रयोग, विज्ञान कार्यशाळा, असे विविध कार्यक्रम याठिकाणी अयोजित करण्यात आले आहेत. अशी माहिती राजेंद्र पवार यांनी दिली आहे.
Read also:
- “बारामती केंद्राला भेट द्याल तेव्हा विज्ञानाचे अनेक चमत्कार बघायला मिळतील”; शरद पवार
- “जलील यांनी सांगितल्यानंतर पंकजा मुंडे लगेचच पक्ष काढणार नाहीत, त्यांचा पक्ष विचार करेल” रावसाहेब दानवे
- “दोन लुटारू भाई भाई अवघा देश लुटून खाऊ”; शरद पवार, अदानी एकाच मंचावर, सदाभाऊंचा टोला
- “मुंबई महापालिका निवडणुकीत ‘मराठी मुलगी’ म्हणून प्रचार करणार”; नवनीत राणांनी पुन्हा थंड थोपटले
- “मोदींपेक्षा कोणी मोठं नाही, त्यांनीच अजित दादांनी पहिले बोलावं असं म्हटलं होतं”