पुणे : राज्यात आगामी काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याआधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाचं तापला आहे. सर्वोच्च न्यायालायच्या आदेशानंतर राज्यात आता इम्पिरीकल डेटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. मात्र त्यामध्येही अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टिका केली आहे.
“अयोध्येत महाराष्ट्र सदन होण्यासाठी योगींशी चर्चा करणार”; आदित्य ठाकरेंनी घेतलं रामलल्लाचं दर्शन
न्यायालयात केस लढून तरी देखील मध्यप्रदेशमध्ये ओबीसीच्या 60 टक्के जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे आपण नापास झालेल्या मुलाचं आदर्श कधीच आपल्या मुलाला सांगत नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाबाबत मध्यप्रदेश हा चांगला उदाहरण नाही. इम्पिरिकल डेटा जमा करण्याचे काम आमचे नेते छगन भुजबळ करत आहेत. त्याचबरोबर मध्यप्रदेश सारखी आपण घाई केली नाही. त्यासाठी आपल्याला देव पावला. नाहीतर आपल्या देखील 60 टक्के जागा कमी झाल्या असत्या असं वक्तव्य राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
“ठाकरे सरकारच पाण्याचे शत्रू , यांनी सिंचन योजनांचा खून केला”; फडणवीसांचा जालन्यात एल्गार
सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर कडाडून टिका केली आहे. ते म्हणाले की, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचं वाट्टोळ करणाऱ्या प्रस्थापितांची ही खरी वृत्ती समोर आली. “एकाअर्थी मला आनंद आहे की, हे ज्या पद्धतीने झालं” या विधानावरुन येणाऱ्या निवडणूका ओबीसी राजकीय आरक्षणाविनाच हे घेणार आहेत, हा त्यांचा हेतू स्पष्ट झाला. मी जाहीर निषेध करतो.
संभाजी राजेंनी केलं मावळ्यांना ‘हे’ आव्हान; जनतेच्या मनातील बोधचिन्ह साकारणार
राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होण्यासाठी इम्पिरिकल डाटा जमा करण्याचे काम सुरू आहे. मात्र काही ठिकाणी आडणावरून जात गृहीत धरली जात असल्याची गोष्ट समोर येत आहेत. अशी पद्धत चुकीचे असून यात सर्वपक्षीयांनी लक्ष घालण्याची गरज आहे. असं छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबात मत व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र देखील पाठवलं आहे.
Read also:
- “आपल्याला देव पावला, नाहीतर आपल्या देखील 60 टक्के जागा कमी झाल्या असत्या”; सुप्रिया सुळे
- “इंग्रज सरकारपेक्षाही वाईट सरकार केंद्रात, आम्ही यांना घाबरत नाही”; नाना पटोले
- राष्ट्रपती निवडणुक ! शरद पवारांनी नकार दिल्यानंतर ममता बॅंनर्जींनी सुचवली ही नावं
- “आता छोटे नवाब महाराष्ट्र भवनासाठी जागा मागणार, मग 2 वर्ष काय फक्त टोमण्यांमध्ये गेले का ?
- “केवळ आडनावावरून ओबीसींची खरी संख्या समजणार नाही”; छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र