मुंबई : विस्थापित मावळ्यांना संघटीत करून जनतेच्या मनातलं स्वराज्य आणण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना केली असल्याचे खासदार संभाजी राजे यांनी मागेच जाहिर केले होते. त्यानंतर आता या संघटनेचे अधिकृत बोधचिन्ह जनतेच्या संकल्पनेतून साकारावे अशी इच्छा व्यक्त करत त्यांनी लोकांना बोधचिन्ह सुचवण्याचे आव्हान केले आहे.
“नरेंद्र मोदी उत्तम नेते नसले तरी उत्तम अभिनेते”; राष्ट्रवादीची खोचक प्रतिक्रिया
राज्यातील आगामी निवडणुका लढवण्याचा संभाजी राजे यांचा मानस आहे. त्यांनी पुण्यात यासाठी स्वराज्य संघटनेची देखील घोषणा केली आहे. स्वराज्य संघटनेसाठी बोधचिन्ह हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे असे स्वराज्य संघटनेची ओळख असेल. तरी कल्पक मंडळींंना आमचे आवाहन आहे की, असे बोधचिन्ह तयार करून खाली व्हॉट्स नंबर 9403788699 वर पाठवण्याचे आवाहन संभाजी राजे यांनी केले आहे.
“सौ पाप करके बिल्ली म्याऊ म्याऊ करने अयोध्या चली”; नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पुन्हा डिवचलं
त्यासाठी काही अटी देखील घातल्या आहेत. बोधचिन्ह हे लक्षवेधी व संस्मरणीय असावे. ते फार क्लिष्ट असू नये. बोधचिन्ह हे रेडियम प्रिंट, ग्राफिक प्रिंट अशा कोणत्याही स्वरूपात वापरण्यास सोयीस्कर असावे, एकदा बोधचिन्ह स्वीकृत केल्यानंतर त्यावर पूर्ण अधिकार हा स्वराज्य संघटनेचा असेल. एखाद्या बोधचिन्हाची संकल्पना आवडल्यास ते स्वीकृत केल्यानंतर , त्यामध्ये कोणतेही बदल करण्याचे अधिकार स्वराज्य संघटनेकडे असतील, हे बोधचिन्ह सोमवार 20 जून पर्यंत पाठवण्याचे आव्हान देखील त्यांनी केले आहे.
“वारकर्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नका”; प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर खोचक टिप्पणी
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजी राजे यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढविण्याचे जाहीर केले होते. मात्र त्यांना कोणत्याही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला नाही. तर शिवसेनेने त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली, मात्र ती ऑफर त्यांनी फेटाळून लावली. त्याआधीच त्यांनी स्वराज्य संघटनेची घोषणा केली होती.
Read also:
- “भाजपने हर्षवर्धन पाटलांना इडीसाठी ब्रँड अँबॅसिडर बनवावा”; काॅंग्रेसचा भाजपला खोचक टोला
- “नकली हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या स्वयंघोषितांनी अयोध्येत दिसू नये हिच श्रीरामांची इच्छा”; दिपाली सय्यद
- “आदित्य ठाकरे अयोध्येला पाप धुण्यासाठी गेले”; रवी राणांचं शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
- “पंकजाताई माझी मोठी बहिण, कोणीही मुर्खपणा करू नये”; निलेश राणेंनी भाजपच्याच नेत्याला खडसावलं
- “फडणवीससाहेबांचा मुख्यमंत्री होण्याचा आजार फार गंभीर झालाय, त्यांना उपचाराची गरज”; रूपाली पाटील