मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी शिवसेनेकडून अयोध्यामध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्यानिमित्ताने आदित्य ठाकरे रामलल्लाची आरती. पत्रकार परिषद, आणि इस्कॉन मंदिराला भेट देणार असा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यासाठी नाशिक, पुणे आणि मुंबईतून हजारो शिवसैनिक अयोध्यामध्ये दाखल झाले आहेत.
वारकऱ्यांसारखेच पंतप्रधान मोदींचे काम”; देवेंद्र फडणवीसांचे देहुत गौरवोद्गार
आदित्य ठाकरे आज सकाळी लखनऊ विमानतळावर पोहचणार असून ते दुपारी इस्कॉन मंदिराच्या भेटीनंतर एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर हनुमान गढी आणि रामललाचे सायंकाळी दर्शन घेऊन शरयु नदीच्या घाटावर आरती देखील करणार आहेत. त्यानंतर सांयकाळी ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे शिवसैनिकांकडून मोठी तयारी करण्यात आली असून आदित्य ठाकरे यांचे पोस्टर देखील लावण्यात आले आहेत.
“बंर झालं पवार साहेबांनी माघार घेतली, नाहीतर मुख्यमंत्री म्हणाले असते, तुम्ही आमचेच राष्ट्रपती”
राज ठाकरे यांनी घेतलेल्या हिंदुत्तवाची भूमिका आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यातील अनेक नेते अयोध्यमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार, त्यानंतर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही अयोध्येला जाऊन आले आहेत. त्याचबरोबर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील अय़ोध्या दौरा केला होता.
आगामी वर्षात देशात 10 लाख पद भरती; नरेंद्र मोदींनी दिले प्रशासनाला आदेश
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत भाजप नेते नितेश राणे यांनी एक ट्विट केले आहेत. त्यात त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधताना म्हणाले की, सौ पाप करके बिल्ली म्याऊ म्याऊ करने अयोध्या चली, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शिवसैनिक यावर काय प्रतिक्रिया देणार ते आता पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
सौ पाप करके बिल्ली meow meow करने अयोध्या चली !!😅😅😅
— nitesh rane (@NiteshNRane) June 15, 2022
Read also:
- “वारकर्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नका”; प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर खोचक टिप्पणी
- मोदींसमोरच औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांनी कान टोचले, म्हणाले आता मोदी है तो..;
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर; उद्धव ठाकरेंनी मानले मोदींचे आभार
- “फडणवीसांना बोलते करून पक्षाचा प्रचार केला, मोदीजी चुक दुरूस्त करा,” अमोल मिटकरी
- अजितदादाला बोलू न देणं धक्कादायक, वेदनादायक,; अजित पवारांना देहुत भाषण करू न दिल्याने सुप्रिया सुळे संतापल्या