पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संत तुकाराम महाजांच्या शिळांचा देहुत उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दमदार भाषण झालं. त्याआधी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे देखील भाषण झाले. मात्र व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाला पंतप्रधान कार्यालयाकडून परवानगी देण्यात न आल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्या देत असेल तर त्यांचं पुण्यात स्वागत करेन” सुप्रिया सुळे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत इतके भान प्रधानमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांना असायला हवे होते. धार्मिक ठिकाणी जर राजकारण करत असाल तर वारकरी सांप्रदाय व महाराष्ट्रातील जनता हे कधीच खपवुन घेणार नाही. असा इशारा आता अमोल मिटकरींनी दिला आहे.
“पवारांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारला कोर्टात एकपण टेस्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने करता आली नाही”
तुकोबारायांचा “भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणु माथा, “हा अभंग स्वतःवर उलटण्याची वेळ येऊ नये याची काळजी देवेंद्र फडणवीस व त्यांच्या अध्यात्माच्या नावाखाली धर्मीक द्वेष पसरवणाऱ्या आध्यात्मिक आघाड्यातील तथाकथित आचार्यांनी घ्यावी. श्री क्षेत्र देहू हे वारकरी धर्माचे पवित्र स्थळ आहे प्रधानमंत्री श्री नरेंद्र जी मोदी आज एक सामान्य वारकरी म्हणून इथे आले असतील तर “भेदाभेद भ्रम अमंगळ l” या तुकोबारायांच्या अभंगाचा त्यांना सोयीने विसर पडला व हा धार्मिक कार्यक्रम भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने राजकीय करून टाकला. असा घणाघात देखील त्यांनी भाजपवर चढवला.
“निवडणुकीत यश मिळो ना मिळो लोकांच्या मनातील मुख्यमंत्री हे राजसाहेब ठाकरेचं”
दरम्यान, अजितदादा हे महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री आहेत, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जर शासकीय प्रोटोकॉल पाळला नसेल व काही कारण नसताना देवेंद्र फडणवीस यांना बोलते करून स्वपक्षाचा प्रचार केला असेल हा संविधानिक पदाचा अपमान आहे. मोदीजी चूक दुरुस्त करा, असंही ते म्हणाले.
Read also:
- अजितदादाला बोलू न देणं धक्कादायक, वेदनादायक,; अजित पवारांना देहुत भाषण करू न दिल्याने सुप्रिया सुळे संतापल्या
- अजितदादाला बोलू न देणं धक्कादायक, वेदनादायक,; अजित पवारांना देहुत भाषण करू न दिल्याने सुप्रिया सुळे संतापल्या
- वारकऱ्यांसारखेच पंतप्रधान मोदींचे काम”; देवेंद्र फडणवीसांचे देहुत गौरवोद्गार
- “बंर झालं पवार साहेबांनी माघार घेतली, नाहीतर मुख्यमंत्री म्हणाले असते, तुम्ही आमचेच राष्ट्रपती”
- आगामी वर्षात देशात 10 लाख पद भरती; नरेंद्र मोदींनी दिले प्रशासनाला आदेश