मुंबई : राज्यसभेची निवडणुक संपल्यानंतर आता विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच राष्ट्रपती पदासाठी निवडणुक होत आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
“५६ इंच छातीचा दाखला देत बसण्यापेक्षा डॉ. मनमोहन सिंह यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे”
राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्ष मोर्चबांधणी करताना दिसत आहेत. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घटक पक्षांना सोबत घेऊन चर्चा सुरू आहेत. यामध्ये शरद पवारांच्या नावाची चर्चा होती. मात्र शरद पवार यांनी यावर बोलताना या निवडणुकीत नसल्याचे म्हटले आहे.
“मग त्यातून माघार घेता येणार नाही”; फडणवीसांनी पुन्हा राज्य सरकारला दिला इशारा
यावर बोलताना भाजप नेते निलेश राणे म्हणाले की, पवार साहेब, राष्ट्रपती निवडणुक पराभवाच्या भीतीने माघार घेण्याचा निर्णय तुमचा योग्य आहे कारण तुमच्याकडे मुख्यमंत्री आहेत. ते म्हणतील तुम्हाला, “मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती, मग जिंकायची गरज काय, आज पासून तुम्ही राष्ट्रपती” असा टोला देखील त्यांनी लगावला.
केंद्रीय निवडणुक आयोग संजय राऊतांची खासदारकी रद्द करणार? दिल्लीत राजकीय हालचाली सुरू
दरम्यान, आगामी काही काळात राष्ट्रपती पदासाठी निवडणुक होत आहे. त्याआधी राज्यात 10 जागांसाठी विधान परिषदेची निवडणुक होत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील भाजपने पाच उमेदवार रिंगणात उभे केले आहेत.
Read also:
- आगामी वर्षात देशात 10 लाख पद भरती; नरेंद्र मोदींनी दिले प्रशासनाला आदेश
- “पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्या देत असेल तर त्यांचं पुण्यात स्वागत करेन” सुप्रिया सुळे
- “पवारांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारला कोर्टात एकपण टेस्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने करता आली नाही”
- “निवडणुकीत यश मिळो ना मिळो लोकांच्या मनातील मुख्यमंत्री हे राजसाहेब ठाकरेचं”
- “दुर्दैवाने देशाच्या राजकारणातून श्रीरामचं हिंदुत्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय”