मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्ये ७८.२९ इतकी विक्रमी घसरण मोदी सरकारच्या कार्यकाळाला नुकतीच आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या आठ वर्षांचा जल्लोष साजरा करताना भाजपने समाज माध्यमांवर आपली टिमकी वाजवण्यासाठी ‘आठ वर्ष मोदी सरकारच्या सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची’ ही मोठी जाहिरातबाजी केली. मात्र याच आठ वर्षांचा परिणाम आता देशाला चांगलाच भोवणार असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
“गांधी नावाच्या वादळाला आता हुकूमशहा घाबरु लागले, सत्य आमच्या सोबत”
जागतिक बाजारात भारतीय रुपयाची ७८.२९ रुपये इतकी सर्वाधिक घसरण नोंद करण्यात आली आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचा दावा सुरुवातीपासूनच मोदी सरकारने केला. तसेच अमेरिकेत आलेली आर्थिक मंदीची झळही आपल्याला बसणार नाही, असा बचावात्मक पवित्रा केंद्राने घेतला.
“सोनिया गांधी रूग्णालयात असून देखील त्यांना इडीची नोटीस, हे निगरगट्ट सरकार” प्रणिती शिंदे
वास्तविक जागतिक अर्थव्यवस्थेकडे डोळसपणे न पाहता अतिआत्मविश्वास बाळगल्यामुळे त्याचा फटका आता भारतीय रुपयाला बसताना दिसत आहे. २००९ साली देखील अमेरिकेत आर्थिक मंदी आली होती, ज्याचे पडसाद जगभरात पाहायला मिळाले. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे भारताला त्याची अधिकची झळ पोहोचली नव्हती.
“मोहिते-पाटिल आणि शिंदे यांच्यात भांडण लावून अजित पवारांनी उजनी धरणावर दरोडा टाकला”
५६ इंच छातीचा दाखला देत बसण्यापेक्षा डॉ. मनमोहन सिंह यांनी समस्येला समजून घेत सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून विधायक निर्णय घेतले होते. मात्र आज राज्यसभेपासून ते राष्ट्रपती आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या एकेक जागेची निवडणूक लढविण्यात भाजप आणि त्यांचे म्होरके व्यस्त असलेले दिसतात. त्यामुळेच त्यांच्याकडून अर्थव्यवस्था सावरण्याचे कोणतेही विधायक निर्णय होताना दिसत नाहीयेत. परिणामी रुपयाचे विक्रमी अवमूलन झाले असून त्याचा परिणाम आता पुन्हा एकदा महागाईचा आकडा वाढण्यावर होईल, असंही राष्ट्रवादीने म्हटले आहे.
Read also:
- “मग त्यातून माघार घेता येणार नाही”; फडणवीसांनी पुन्हा राज्य सरकारला दिला इशारा
- केंद्रीय निवडणुक आयोग संजय राऊतांची खासदारकी रद्द करणार? दिल्लीत राजकीय हालचाली सुरू
- पंकजा मुंडेंना उमेदवारी का नाकारली? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
- “म्या एक पाऊल मागं आलुया, म्हंजी थकलो नाय”; विधानपरिषदेच्या निवडणुकीतून खोतांची माघार
- मोठी बातमी ! विधान परिषदेच्या निवडणुकीतून सदाभाऊ खोतांची माघार