मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी इडीने समन्स पाठवलं आहे. आज काॅंग्रेसच्या मोठ्या कार्यकर्त्यांसह राहुल गांधी इडीच्या कार्यालयात जाणार आहेत. त्याआधी राज्यभरात काॅंग्रेसने आक्रमक भमिका घेत ठिकठिकाणी केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्याविरोधात मोर्चा काढले आहेत.
“राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार, हे माझं भाकीत खरं ठरताना दिसतंय”; सुजय विखे पाटील
2015 साली बंद झालेली केस पुन्हा ओपन करून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर मुद्याहुन कारवाई केली जात आहे. देशातील कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणांना स्वायत्तता राहिलेली नाही. त्यांच्यावर दबाब टाकण्याचं काम भाजप करीत असून लोकशाहीची हत्या करणाऱ्या काम सुरू असल्याचा आरोप काॅंग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा यापुढे महाराष्ट्रभरात चालणार : आमदार महेश लांडगे
जोपर्यंत काॅंग्रेसच्या नेत्यांची छळवणुक सुरू आहे, तोपर्यंत देशातील ज्या ज्या ठिकाणी इडीचे कार्यलय आहेत. त्याठिकाणी काॅंग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करीत राहतील. राज्यातील प्रमुख नेत्यांवर इडीची कारवाई होत असून ती कारवाई आता राहुल गांधी यांच्यापर्यत पोहचली आहे. सोनिया गांधी रूग्णालयात उपचार घेत असून देखील यांना काही वाटत नाही. त्यामुळे निगरकट्ट हे सरकार झाले आहेत. असा घणाघात देखील प्रणिती शिंदे यांनी लगावला.
“वेश्या व्यावसायाला प्रोफेशन म्हणून स्वीकारा”; अमृता फडणवीसांचं बुधवार पेठेत वक्तव्य
दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना अलिकडेच इडीची नोटीस आली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी शक्तीप्रदर्शन करीत दिल्लीतील इडीच्या कार्यलयात आज उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर आज मुंबईतील इडीच्या कार्यलायबाहेर काॅंग्रेसने आक्रमक भुमिका घेत केंद्र सरकार आणि इडीच्याविरोधात जोरदार आंदोलने केले.
Read also:
- “मोहिते-पाटिल आणि शिंदे यांच्यात भांडण लावून अजित पवारांनी उजनी धरणावर दरोडा टाकला”
- “शरद पवारांचं काम समुद्राएवढं विशाल, बच्चू कडूंनी त्यांचा अभ्यास करावा”
- “शरद पवारांचं काम समुद्राएवढं विशाल, बच्चू कडूंनी त्यांचा अभ्यास करावा”
- राऊतांनी यापुढे जरी सांगितलं की तुम्ही मतदान आघाडीला देऊ नका तरी आम्ही..; देवेंद्र भुयार
- “त्या गद्दारांच्या यादीत पहिलं नाव अब्दुल सत्तारांचं होतं”; सत्तरांना दानवेंचं जोरदार प्रत्युत्तर