मुंबई : राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनी घात केल्याने पराभव झाला असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. यामध्ये अमरावतीचे आमदार देवेंद्र भुयार यांचा देखील राऊतांनी नाव घेतलं होतं. मात्र हे सर्व आरोप फेटाळून देवेंद्र भुयार यांनी शरद पवार आणि त्यानंतर काल संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबत भाष्य केलं.
“मी पुन्हा येईन म्हणत फडणवीस ह्यांची पावलं पडली अन् विरोधकांची गढी डगमगली”; सदाभाऊ खोत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हे शरद पवार आणि अजित पवार यांनी देखील म्हटले चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्याचा परिणाम राजकीय, सामाजिक दृष्ट्या आमच्यावर होत आहे. बलाढ्य शक्तींच्या विरोधात लढणे आणि त्याचबरोबर आमच्यावर अशा प्रकारे अविश्वास दाखवणे हे बरोबर नाही. त्यामुळे संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दुर केली.
“अनाजी पंतांनी काहीही केले तरी पुन्हा येता येणार नाही”; दिपाली सय्यदचा फडणवीसांना खोचक टोला
संजय राऊतांनी यापुढे जरी सांगितलं की तुम्ही मतदान महाविकास आघाडीला देऊ नका, तरी आम्ही आमचं मत हे महाविकास आघाडीला देणार आहे. भाजपची विचारधारा पटत नसल्याने शरद पवारांच्या नेतृत्व मला मान्य असेल. विधान परिषद निवडणुकीसाठी आज सगळ्याच आमदारांना सुचना दिल्या आहेत. असंही ते म्हणाले.
“भाजपच्या विजयामुळे काहींचे चेहरे पडलेत, काही बावचाळलेत तर अनेक जण फिसाटले”; देवेंद्र फडणवीस
निवडणुका आल्या की आम्हाला ग्रॅंड हयात , ड्रग्नन किंवा मोठ्य़ा हॉ़टेल आहेत. त्याठिकाणी आम्हाला बोलवलं जातंय. एकदा निवडणुका संपल्या की आम्हाला कुणी विचारतही नाही. हे अपक्ष आमदारांचं दुर्दैव आहे. या गोष्टी होऊ नये म्हणून त्यांना पहिल्यांदा अशी बोलणी करून घेतो. केवळ निवडणुकांमध्येच अपक्ष आमदारांना स्थान मिळतंय बाकी वेळेत मिळत नाही. असंही ते म्हणाले.
Read also:
- “त्या गद्दारांच्या यादीत पहिलं नाव अब्दुल सत्तारांचं होतं”; सत्तरांना दानवेंचं जोरदार प्रत्युत्तर
- “राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार, हे माझं भाकीत खरं ठरताना दिसतंय”; सुजय विखे पाटील
- देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा यापुढे महाराष्ट्रभरात चालणार : आमदार महेश लांडगे
- संजय राऊत तुम्ही ज्यांचा स्वाभिमानी म्हणून उल्लेख करता, त्याच्या बुडावर लाथ घालून..;
- “वेश्या व्यावसायाला प्रोफेशन म्हणून स्वीकारा”; अमृता फडणवीसांचं बुधवार पेठेत वक्तव्य