मुंबई : राज्यसभा निवडणुकीत सहा आमदारांची मत फुटल्याने शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. यामध्ये स्वाभिमानी संघटनेचे अमरावतीमधील मोर्चीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. आता यावरून स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यासंपुर्ण प्रकरणाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“घोडेबाजारातील असतो तर अगोदरच विकलो गेलो असतो”; राऊतांना संजयमामांचं जोरदार प्रत्युत्तर
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ज्या आमदाराचा उल्लेख स्वाभिमानीचा म्हणून केला आहे. त्याच्या बुडावर लाथ घालून पुर्वीच आम्ही हकालपट्टी केली आहे. त्यामुळे कृपा करून स्वाभिमानीचा आमदार असा उल्लेख करू नका. त्याचबरोबर त्यांनी या निवडणुकीत कशा प्रकारे वर्तन केले. या प्रश्नाचं उत्तर अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देतील, असं ही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
निवडणूक राज्यसभेची अन् चर्चा पुणे जिल्ह्यातील ‘या’ चार आमदारांची !
नांदेडमधील लोडाचे अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे , अमरावतीमधील मोर्चीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि सोलापुरचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांच्यावर राऊतांनी गंभीर आरोप केले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष आमदार घोडेबाजारात विकले गेल्याने पराभवाचा सामाना करावा लागला असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊतांचे सर्व आरोप संजय मामा शिंदे यांनी फेटाळून लावले तर अपक्ष आमदार नरेंद्र भोंडे यांनी संजय राऊतांना याबाबत समर्थन दिले आहे.
“केंद्रीय यंत्रणा तुमच्या कामी आल्या, 2024 ला हा हिशोब चुकता करू”; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा
दरम्यान, महाविकास आघाडीच्या बाजूने राष्ट्रवादी, काॅंग्रेस बच्चू कडू, गडाख, यड्रावकर आणि इतरांची सर्व मते आम्हाला मिळाली आहेत. फक्त घोडेबाजारात जे उभे होते त्यांचे सहा मते पडली नाही. तरीही आम्हाला 33 मते मिळाली असून हा आमचा विजय आहे. त्याचबरोबर हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, हरभरे काही अपक्षांनी खाल्ले आहेत. तुम्ही हरभऱ्याच्या झाडावर चढू नका असा इशाराही राऊतांनी भाजपला दिला.
@rautsanjay61 Ji ज्या आमदाराचा उल्लेख तुम्ही स्वाभिमानीचा म्हणून केलेला आहात त्याच्या बुडावर लाथ घालून पुर्वीच आम्ही हकालपट्टी केली आहे.तेंव्हा कृपा करून स्वाभिमानीचा आमदार असा उल्लेख करू नका तो असा का वागला या प्रश्नाच उत्तर तुम्हाला@AjitPawarSpeaks व @Jayant_R_Patil देतील.@ANI
— Raju Shetti (@rajushetti) June 11, 2022
Read also:
- “वेश्या व्यावसायाला प्रोफेशन म्हणून स्वीकारा”; अमृता फडणवीसांचं बुधवार पेठेत वक्तव्य
- “मी पुन्हा येईन म्हणत फडणवीस ह्यांची पावलं पडली अन् विरोधकांची गढी डगमगली”; सदाभाऊ खोत
- “अनाजी पंतांनी काहीही केले तरी पुन्हा येता येणार नाही”; दिपाली सय्यदचा फडणवीसांना खोचक टोला
- “भाजपच्या विजयामुळे काहींचे चेहरे पडलेत, काही बावचाळलेत तर अनेक जण फिसाटले”; देवेंद्र फडणवीस
- “कोण फुटलं, का फुटलं.? आज ना उद्या ते कळेल”; राऊतांच्या आरोपांवर भोंडेंचं समर्थन