मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा आवाज दडपू पाहणार्या केंद्र सरकार विरोधात काॅंग्रेसने आक्रमक भुमिका घेतली आहे. काॅंग्रेसप्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील इडीच्या कार्यालयाबाहेर काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शन करत मोदी सरकारच्या दडपशाहीचा कडाडून विरोध केला.
“त्या गद्दारांच्या यादीत पहिलं नाव अब्दुल सत्तारांचं होतं”; सत्तरांना दानवेंचं जोरदार प्रत्युत्तर
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अलिकडेच इडीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर आज काॅंग्रेसने शक्तीप्रदर्शन करत राहुल गांधी इडीच्या कार्यलयात जाणार आहेत. यामुळे काॅंग्रसेच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर सोनिया गांधी यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
“राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार, हे माझं भाकीत खरं ठरताना दिसतंय”; सुजय विखे पाटील
गांधी नावाच्या वादळाला आता हुकूमशहा घाबरु लागलेत. सत्य आमच्या सोबत आहे, आम्ही छाती ठोकपणे तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला येत आहोत. असं काॅंग्रेसने म्हटले आहे. जोपर्यंत काॅंग्रेसच्या नेत्यांची छळवणुक सुरू आहे, तोपर्यंत देशातील ज्या ज्या ठिकाणी इडीचे कार्यलय आहेत. त्याठिकाणी काॅंग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करीत राहतील. राज्यातील प्रमुख नेत्यांवर इडीची कारवाई होत असून ती कारवाई आता राहुल गांधी यांच्यापर्यत पोहचली आहे. सोनिया गांधी रूग्णालयात उपचार घेत असून देखील यांना काही वाटत नाही. त्यामुळे निगरकट्ट हे सरकार झाले आहेत. असा घणाघात देखील प्रणिती शिंदे यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा यापुढे महाराष्ट्रभरात चालणार : आमदार महेश लांडगे
दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना अलिकडेच इडीची नोटीस आली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी शक्तीप्रदर्शन करीत दिल्लीतील इडीच्या कार्यलयात आज उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर आज मुंबईतील इडीच्या कार्यलायबाहेर काॅंग्रेसने आक्रमक भुमिका घेत केंद्र सरकार आणि इडीच्याविरोधात जोरदार आंदोलने केले.
Read also:
- “सोनिया गांधी रूग्णालयात असून देखील त्यांना इडीची नोटीस, हे निगरगट्ट सरकार” प्रणिती शिंदे
- “मोहिते-पाटिल आणि शिंदे यांच्यात भांडण लावून अजित पवारांनी उजनी धरणावर दरोडा टाकला”
- “शरद पवारांचं काम समुद्राएवढं विशाल, बच्चू कडूंनी त्यांचा अभ्यास करावा”
- “शरद पवारांचं काम समुद्राएवढं विशाल, बच्चू कडूंनी त्यांचा अभ्यास करावा”
- राऊतांनी यापुढे जरी सांगितलं की तुम्ही मतदान आघाडीला देऊ नका तरी आम्ही..; देवेंद्र भुयार