मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. ओबीसी आरक्षणासंदर्भात एम्पिरिकल डेटा गोळा करण्याच्या कामात प्रचंड गोंधळ सरू असल्याचंही फडणवीसांनी सांगितले आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेला येण्याची शक्यता आहे.
“सोनिया गांधी रूग्णालयात असून देखील त्यांना इडीची नोटीस, हे निगरगट्ट सरकार” प्रणिती शिंदे
ओबीसी आरक्षणासंदर्भात एम्पिरीकल डेटा गोळा करण्याच्या कामात प्रचंड गोंधळ सुरू आहे. ओबीसींची संख्या घटलेली दिसेल, अशा पद्धतीने हे काम होत आहे. हे सरकार नेहमीच उशिरा जागे होते, म्हणून आजच सरकारला इशारा देतो आहे. याचा संपूर्ण तपशील योग्य वेळी देईन. मध्यप्रदेश सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे काम केले. एकदा हे सर्वेक्षण पूर्ण होऊन, न्यायालयात सादर झाले की मग त्यातून माघार घेता येणार नाही आणि ओबीसींचे कायमस्वरूपी आणि मोठे नुकसान झालेले असेल. त्यामुळे आजच सावध व्हा. अन्यथा भाजपला पुन्हा मैदानात उतरावे लागेल. असंही ते म्हणाले,
“मोहिते-पाटिल आणि शिंदे यांच्यात भांडण लावून अजित पवारांनी उजनी धरणावर दरोडा टाकला”
विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत बोलताना म्हणाले की, विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, अशी आमची अपेक्षा होती. पण सत्ताधारी पक्षांना त्यात यश मिळू शकले नाही. काँग्रेसने नकार दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. आमचे 5 उमेदवार आहेत. आम्ही सर्व 5 जागा जिंकू, हा पूर्ण विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितले.
“शरद पवारांचं काम समुद्राएवढं विशाल, बच्चू कडूंनी त्यांचा अभ्यास करावा”
दरम्यान, पंकजा मुंडे यांना पक्षांनी राष्ट्रीय सचिव पद दिले आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे मध्यप्रदेश राज्याची देखील जबाबदारी दिली आहे. त्या कामानिमित्ताने सातत्याने मध्यप्रदेशला जात असतात. त्याठिकाणी आता निवडणुका देखील आहेत. आम्ही एकमेकांच्या संपर्कात असून भारतीय जनता पार्टी एक परिवार असून आम्ही त्यांचे घटक आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Read also:
- केंद्रीय निवडणुक आयोग संजय राऊतांची खासदारकी रद्द करणार? दिल्लीत राजकीय हालचाली सुरू
- पंकजा मुंडेंना उमेदवारी का नाकारली? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
- “म्या एक पाऊल मागं आलुया, म्हंजी थकलो नाय”; विधानपरिषदेच्या निवडणुकीतून खोतांची माघार
- मोठी बातमी ! विधान परिषदेच्या निवडणुकीतून सदाभाऊ खोतांची माघार
- “गांधी नावाच्या वादळाला आता हुकूमशहा घाबरु लागले, सत्य आमच्या सोबत”