मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीकरीता येत्या २० जून रोजी मतदान होत आहे. यावेळी भाजपकडून पाच उमेदवार मैदानात उतरले आहेत. पंकजा मुंडे यांना या ही वेळेस डावलण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी मोठा राडा केला होता. आता यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“शरद पवारांचं काम समुद्राएवढं विशाल, बच्चू कडूंनी त्यांचा अभ्यास करावा”
पंकजा मुंडे यांना पक्षांनी राष्ट्रीय सचिव पद दिले आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे मध्यप्रदेश राज्याची देखील जबाबदारी दिली आहे. त्या कामानिमित्ताने सातत्याने मध्यप्रदेशला जात असतात. त्याठिकाणी आता निवडणुका देखील आहेत. आम्ही एकमेकांच्या संपर्कात असून भारतीय जनता पार्टी एक परिवार असून आम्ही त्यांचे घटक आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“शरद पवारांचं काम समुद्राएवढं विशाल, बच्चू कडूंनी त्यांचा अभ्यास करावा”
पंकजा मुंडे यांनी देखील मागील काही मुलाखतीमध्ये विधान परिषदेसाठी निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र त्यांच्या जागी उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांकडून भाजपच्या कार्यालयावर दगडफेक देखील करण्यात आली होती.
राऊतांनी यापुढे जरी सांगितलं की तुम्ही मतदान आघाडीला देऊ नका तरी आम्ही..; देवेंद्र भुयार
दरम्यान, भाजपकडून प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि प्रा. राम शिंदे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच काॅंग्रेसकडून भाई जगताप, आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून सचिन आहिर आणि आमशा पाडवी यांना संधी देण्यात येणार आहे. जयंत पाटील यांनी देखील आज राष्ट्रवादी काॅंग्रेसकडील उमेदवारांची नावे घोषित केली आहे.
Read also:
- “म्या एक पाऊल मागं आलुया, म्हंजी थकलो नाय”; विधानपरिषदेच्या निवडणुकीतून खोतांची माघार
- मोठी बातमी ! विधान परिषदेच्या निवडणुकीतून सदाभाऊ खोतांची माघार
- “गांधी नावाच्या वादळाला आता हुकूमशहा घाबरु लागले, सत्य आमच्या सोबत”
- “सोनिया गांधी रूग्णालयात असून देखील त्यांना इडीची नोटीस, हे निगरगट्ट सरकार” प्रणिती शिंदे
- “मोहिते-पाटिल आणि शिंदे यांच्यात भांडण लावून अजित पवारांनी उजनी धरणावर दरोडा टाकला”