मुंबई : राज्यसभा निवडणुकीत काही अपक्ष आमदार घोडेबाजारात सामील झाल्याने शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्याचबरोबर राऊतांना त्या सहा अपक्ष आमदारांची नावे देखील उघड केली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्यांनी ट्विट केले आहे.
“सोनिया गांधी रूग्णालयात असून देखील त्यांना इडीची नोटीस, हे निगरगट्ट सरकार” प्रणिती शिंदे
आज मी दिल्लीला जाणार आहे. संजय राऊत यांच्या आमदारांना धमकी देण्याच्या प्रकरणाची आणि भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांची खासदारकी रद्द करण्यासाठी निवडणुक आयोगाला विनंती करणार आहे. अशा पद्धतीचं ट्विट किरीट सोमय्यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात आता एकच चर्चा रंगली आहे. तसेच यावर आता संजय राऊत काय प्रतिक्रिया देणार? त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
“मोहिते-पाटिल आणि शिंदे यांच्यात भांडण लावून अजित पवारांनी उजनी धरणावर दरोडा टाकला”
संजय राऊत यांनी सहा आमदारांची नावे उघड केली आहेत. त्यांनी आपला विश्वासघात केला आहे. त्या आमदारांनी शिवसेनेला दिलेल्या वचनानुसार मते दिली नाहीत. असे संजय राऊत यांनी म्हटल असून हे कायद्याच्या विरोधात आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले आहेत. याबाबत मी केंद्रीय निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही ते म्हणाले.
“शरद पवारांचं काम समुद्राएवढं विशाल, बच्चू कडूंनी त्यांचा अभ्यास करावा”
दरम्यान, संजय राऊतांनी ज्या अपक्ष आमदारांचं नाव घेतले होते. त्यात अमरावतीचे आमदार देवेंद्र भुयार यांचं देखील नाव होतं. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली होती. व त्यांची नाराजी दुर केली असल्याचंही देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
Read also:
- तुम्ही परत आमच्यासोबत या; विखे पाटलांचं अजित पवारांना भाजपमध्ये येण्याचं आवाहन
- पंकजा मुंडेंना उमेदवारी का नाकारली? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
- “म्या एक पाऊल मागं आलुया, म्हंजी थकलो नाय”; विधानपरिषदेच्या निवडणुकीतून खोतांची माघार
- मोठी बातमी ! विधान परिषदेच्या निवडणुकीतून सदाभाऊ खोतांची माघार
- “गांधी नावाच्या वादळाला आता हुकूमशहा घाबरु लागले, सत्य आमच्या सोबत”