मुंबई : महाराष्ट्रातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त आमदार निवडून देखील सत्ता मिळवता आली नाही. मात्र त्यावेळीच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप यांच्यासोबत जाऊन पहाटे देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पाडला होता. मात्र विधानसभेत भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही आणि परत अजित पवारांनी शिवसेनेला साथ देऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. अशातच आता भाजपच्या एका नेत्याने अजित पवारांना ऑफर दिली आहे.
“मोहिते-पाटिल आणि शिंदे यांच्यात भांडण लावून अजित पवारांनी उजनी धरणावर दरोडा टाकला”
काॅंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले राधाकुष्ण विखे पाटील यांनी एका मुलाखतीमध्ये अजित पवारांनी भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. त्याच बरोबर त्यांनी अजित पवारांचं कौतुक देखील केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत विखे पाटलांनी अजित पवारांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.
“शरद पवारांचं काम समुद्राएवढं विशाल, बच्चू कडूंनी त्यांचा अभ्यास करावा”
ते म्हणाले की, अजित पवार हे स्पष्टवक्ते आहे, दिलेला शब्द पाळणारे आहेत. त्यांना माझा एवढाच सल्ला आहे की तुम्ही परत आमच्यासोबत या. असं राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ज्या पद्धतीने पहाटे मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्याची चर्चा आता समाजमाध्यमांवर पुन्हा एकदा रंगू लागली आहे.
“शरद पवारांचं काम समुद्राएवढं विशाल, बच्चू कडूंनी त्यांचा अभ्यास करावा”
दरम्यान, राज्यसभेची निवडणुक पार पाडल्यानंतर राज्यात आता दहा जांगासाठी विधान परिषदेकरीता निवडणुक होऊ घातली आहे. या निवडणुकीत एकुण 11 उमेदवार असून प्रत्येक उमेदवाराला 27 मत मिळवणे आवश्यक आहे. अशातच आता विखे पाटलांनी केलेल्या वक्तव्याने राज्यात एकच चर्चा रंगली आहे.
Read also:
- पंकजा मुंडेंना उमेदवारी का नाकारली? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
- “म्या एक पाऊल मागं आलुया, म्हंजी थकलो नाय”; विधानपरिषदेच्या निवडणुकीतून खोतांची माघार
- मोठी बातमी ! विधान परिषदेच्या निवडणुकीतून सदाभाऊ खोतांची माघार
- “गांधी नावाच्या वादळाला आता हुकूमशहा घाबरु लागले, सत्य आमच्या सोबत”
- “सोनिया गांधी रूग्णालयात असून देखील त्यांना इडीची नोटीस, हे निगरगट्ट सरकार” प्रणिती शिंदे