मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उद्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित असणार आहे. त्याआधी पुणे, मुंबई आणि नाशिक येथील काही शिवसैनिक अयोध्यामध्ये दाखल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी विरोधकांवर तोफ डागली.
मोठी बातमी ! विधान परिषदेच्या निवडणुकीतून सदाभाऊ खोतांची माघार
सध्याच्या काळात राजकीय विरोधकांना चिरडण्यासाठी राजकीय पक्षाची चढाओढ सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण कमालीचे दुषित झाले आहे. पुर्वीच्या काळी विरोधकांशी अदबीने वागण्याची संस्कृती होती. पंडित नेहरूंपासून ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापर्यत ही संस्कृती जपली गेली. दुर्दैवाने आजच्या राजकारणातील सहिष्णुता संपली आहे. विरोधी विचारांच्या आणि धर्माच्या लोकांना चिरडले जात आहे. हे प्रभु श्रीरामांचं हिंदुत्व नाही, अंसा घणाघात देखील त्यांनी लगावला.
“गांधी नावाच्या वादळाला आता हुकूमशहा घाबरु लागले, सत्य आमच्या सोबत”
प्रभू श्रीरामांनी समन्वयाचं राजकारण केलं. समन्वयाने अंहकार दुर करणे हा हिंदुत्वाचा भाग आहे. आज दुर्दैवाने देशाच्या राजकारणातून समन्वयाचं हिंदुत्व आणि संयम नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा लोकांनी प्रभू श्रीराम आपला आदर्श असल्याचे सांगण्यात कारण नाही. अयोध्येतील राम मंदिर आंदोलन म्हणा किंवा हिंदुत्वासाठीची अन्य पातळ्यांवरील लढाई म्हणा, यामध्ये शिवसेनेचा खारीचा का होईना वाटा असल्याचंही ते म्हणाले.
“सोनिया गांधी रूग्णालयात असून देखील त्यांना इडीची नोटीस, हे निगरगट्ट सरकार” प्रणिती शिंदे
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान देणारे उत्तरप्रदेशमधील भाजपचे खासदार बृजभुषण सिंह यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना ललकारलं आहे. शिवसेनेचे कोणतेही नेत्यांना माझा विरोध नाही. मात्र राज ठाकरे यांच्या परिवारातील कोणताही सदस्य अयोध्येला आला तर त्यांना विरोध करणार असं ते म्हणाले.
Read also:
- “५६ इंच छातीचा दाखला देत बसण्यापेक्षा डॉ. मनमोहन सिंह यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे”
- “मग त्यातून माघार घेता येणार नाही”; फडणवीसांनी पुन्हा राज्य सरकारला दिला इशारा
- केंद्रीय निवडणुक आयोग संजय राऊतांची खासदारकी रद्द करणार? दिल्लीत राजकीय हालचाली सुरू
- पंकजा मुंडेंना उमेदवारी का नाकारली? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
- “म्या एक पाऊल मागं आलुया, म्हंजी थकलो नाय”; विधानपरिषदेच्या निवडणुकीतून खोतांची माघार