पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून देहुतील जगतगुरू श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते दुपारी मुंबईतील राजभवन येथे जलभुषण बिल्डिंग आणि क्रांतिकारकांच्या गॅलरीचे उद्घाटन देखील करणार आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.
केंद्रीय निवडणुक आयोग संजय राऊतांची खासदारकी रद्द करणार? दिल्लीत राजकीय हालचाली सुरू
देहुतील कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र काही कारणास्तव मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. मी मंदिरात कधीही मागायला जात नाही. फक्त आभार मानायला जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्या देत असेल तर त्यांचं मी स्वागतच करेल. भारतातही नवीन पिढीला नोकरी मिळत असेल तर मनापासून मी स्वागत करते, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पंकजा मुंडेंना उमेदवारी का नाकारली? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी देहुत येणार असून त्याठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोदींच्या कॅन्हॉय जाणाऱ्या मार्गावर बीडीडीएस पथकाकडून तपासणी सुरू आहे. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या ठिकाणी काळा कपडा, मास्क काढण्यास पोलिसांकडून मज्जाव केला जात आहे.
“म्या एक पाऊल मागं आलुया, म्हंजी थकलो नाय”; विधानपरिषदेच्या निवडणुकीतून खोतांची माघार
दरम्यान, सुरक्षाच्या कारणास्तव पिंपची चिंचवड आणि पुण्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांकडून सुरू आहे. तसेच ज्यांच्याकडे शस्त्र आढळून आले होते. अशा सर्व आरोपींना पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पोलिसांकडून मोदींच्या सुरक्षासंबंधी सर्व काळजी घेतली जात आहे.
Read also:
- “पवारांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारला कोर्टात एकपण टेस्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने करता आली नाही”
- “निवडणुकीत यश मिळो ना मिळो लोकांच्या मनातील मुख्यमंत्री हे राजसाहेब ठाकरेचं”
- “दुर्दैवाने देशाच्या राजकारणातून श्रीरामचं हिंदुत्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय”
- “५६ इंच छातीचा दाखला देत बसण्यापेक्षा डॉ. मनमोहन सिंह यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे”
- “मग त्यातून माघार घेता येणार नाही”; फडणवीसांनी पुन्हा राज्य सरकारला दिला इशारा