पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संत तुकाराम महाजांच्या शिळांचा देहुत उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दमदार भाषण झालं. त्याआधी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे देखील भाषण झाले. मात्र व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाला पंतप्रधान कार्यालयाकडून परवानगी देण्यात ऩ आल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
“पवारांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारला कोर्टात एकपण टेस्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने करता आली नाही”
अजित पवार यांच्या कार्यालयाकडून पंतप्रधान कार्यालयाकडे देहुत अजित पवारांना भाषण करण्याची विनंती केली होती. मात्र त्यांना भाषण करण्याची कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. हे अत्यंत गंभीर आहे. कारण महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, जिल्हाचा पालकमंत्री आणि राजकीय नेत्याला भाषण करू दिलं नाही. हे अतिशय धक्कादायक, दुर्दैवी, वेदनादायक आणि अपमानकारक असल्याचं मत सुप्रिया सुळे यांनी मांडलं आहे.
“निवडणुकीत यश मिळो ना मिळो लोकांच्या मनातील मुख्यमंत्री हे राजसाहेब ठाकरेचं”
अजित पवारांना व्यासपीठावर भाषण करू न दिल्याने महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. राज्याचा उपमुख्यमंत्री व्यासपीठावर उपलब्ध असल्याने त्यांना प्रोटोकॉलनुसार भाषण करू दिलं पाहिजे होतं हा त्यांचा अधिकार होता. हे अयोग्य आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना भाषण करू दिलं पाहिजे होतं. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. असंही ते म्हणाल्या.
“दुर्दैवाने देशाच्या राजकारणातून श्रीरामचं हिंदुत्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय”
दरम्यान, आपल्या प्रोटोकॉल नुसार अजित पवारांनी पंतप्रधानांना पुण्याच्या लोहगाव विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर मोदींनी देहुतील संत तुकाराम महाजांचं दर्शन घेतले. यावेळी मोठ्या प्रमाणात वारकरी कार्यक्रमाला उपस्थित होते.
Read also:
- अजितदादाला बोलू न देणं धक्कादायक, वेदनादायक,; अजित पवारांना देहुत भाषण करू न दिल्याने सुप्रिया सुळे संतापल्या
- वारकऱ्यांसारखेच पंतप्रधान मोदींचे काम”; देवेंद्र फडणवीसांचे देहुत गौरवोद्गार
- “बंर झालं पवार साहेबांनी माघार घेतली, नाहीतर मुख्यमंत्री म्हणाले असते, तुम्ही आमचेच राष्ट्रपती”
- आगामी वर्षात देशात 10 लाख पद भरती; नरेंद्र मोदींनी दिले प्रशासनाला आदेश
- “पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्या देत असेल तर त्यांचं पुण्यात स्वागत करेन” सुप्रिया सुळे