मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांनी मुख्यमंत्री आणि सरकारच्या तक्रारींचा पाढा वाचला. औरंगाबाद येथील पाणी प्रश्नांवरून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचे कान टोचले. त्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबादच्या पाणी प्रश्नाबाबत राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
“बंर झालं पवार साहेबांनी माघार घेतली, नाहीतर मुख्यमंत्री म्हणाले असते, तुम्ही आमचेच राष्ट्रपती”
राज्यात सिंचन योजना आहेत. त्यासाठी मंत्री अधिकारी बैठकीया येतात परंतु परंतु 80 सिंचन योजना अजूनही तशाच आहेत. ज्या 20 वर्षाहुन अधिक काळापासून सुरू आहेत. काही योजनांचं काम हे 70 ते 80 टक्के पुर्ण झालं आहे, मात्र त्यांचा लाभ अजूनही नागरिकांना मिळत नाही. त्याचबरोबर अनेक योजना अर्ध्या असून त्यात पंतप्रधानांनीच हात घालावे असं ही राज्यपाल म्हणाले.
आगामी वर्षात देशात 10 लाख पद भरती; नरेंद्र मोदींनी दिले प्रशासनाला आदेश
औरंगाबाद येथे 5 दिवसानंतर एकदा पाणी नागरिकांना मिळत आहे. हे काही योग्य नाही. अरूण जेटली त्यावेळी म्हणाले होते की, मोदी है मुमकीन है. आता मी आठ वर्षानंतर पुन्हा एकदा म्हणतो की मोदी है तो मुमकीन है, या योजना पूर्ण झाल्या पाहिजे, असं म्हणत त्यांनी मोदींना विनंती केली तर मुख्यमंत्र्यांचं कान टोचले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्या देत असेल तर त्यांचं पुण्यात स्वागत करेन” सुप्रिया सुळे
दरम्यान, राज्यपालांनी विद्यापीठीतील मुद्दा देखील यावेळी उपस्थित केला. त्याचबरोबर विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा अद्यापही चिघळलेला आहे. त्यातच गेल्या अधिवेशनाच्या वेळी समर्थ रामदासांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपालांना त्यांचे भाषण न करताच परतावे लागलेले होते. अशा स्थितीत त्यांनी पाणी प्रश्न, सिंचन प्रकल्प, हे मुद्दे काढून मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
Read also:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर; उद्धव ठाकरेंनी मानले मोदींचे आभार
- “फडणवीसांना बोलते करून पक्षाचा प्रचार केला, मोदीजी चुक दुरूस्त करा,” अमोल मिटकरी
- अजितदादाला बोलू न देणं धक्कादायक, वेदनादायक,; अजित पवारांना देहुत भाषण करू न दिल्याने सुप्रिया सुळे संतापल्या
- अजितदादाला बोलू न देणं धक्कादायक, वेदनादायक,; अजित पवारांना देहुत भाषण करू न दिल्याने सुप्रिया सुळे संतापल्या
- वारकऱ्यांसारखेच पंतप्रधान मोदींचे काम”; देवेंद्र फडणवीसांचे देहुत गौरवोद्गार