मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजभवनातील क्रांतीकारी गॅलरीचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बऱ्याच काळानंतर एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिले. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषण केले.
आगामी वर्षात देशात 10 लाख पद भरती; नरेंद्र मोदींनी दिले प्रशासनाला आदेश
आपल्या देशाला स्वातंत्र्य हे आंदण म्हणून नाही तर स्वातंत्र्य आपल्याला लढून मिळवावं लागलं आहे. तो इतिहास नुसता जतन नाही तर जिवंत करणं हे आपलं काम आहे. आपण पारतंत्र्यात १५० वर्षे होतो आता स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, पुढे जात असतांना हा वारसा पुढच्या पिढीला देण्याच काम केलं नाही तर आपण आपल्या कर्तव्याला मुकतो आहोत. असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्या देत असेल तर त्यांचं पुण्यात स्वागत करेन” सुप्रिया सुळे
जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्यासाठी कितीजणांनी आपल्या घरादारावर निखारे ठेवले, किती जणांनी बलिदान दिलं, कितीजणांनी मरण यातना सोसल्या, क्षणभर विचार केला हे असं घडलं नसतं तर आपण हे स्वातंत्र्य उपभोगू शकलो असतो का हा प्रश्न मनात येतो.
“पवारांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारला कोर्टात एकपण टेस्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने करता आली नाही”
ज्ञात अज्ञात क्रांतीकारकांचे ज्यांनी देशासाठी त्याग केला त्यांचे संकलन व्हायला पाहिजे म्हणून एक पुस्तक आपण तयार करत आहोत. नुसतं बोलत बसण्यापेक्षा क्रांतीकारकांनी ज्या गोष्टी केल्या त्यांच्या त्यागाच्या एक कण जरी काम आपण करू शकलो तरी त्यांचे बलिदान कृतार्थ होईल. असंही ते म्हणाले.
Read also:
- “फडणवीसांना बोलते करून पक्षाचा प्रचार केला, मोदीजी चुक दुरूस्त करा,” अमोल मिटकरी
- अजितदादाला बोलू न देणं धक्कादायक, वेदनादायक,; अजित पवारांना देहुत भाषण करू न दिल्याने सुप्रिया सुळे संतापल्या
- अजितदादाला बोलू न देणं धक्कादायक, वेदनादायक,; अजित पवारांना देहुत भाषण करू न दिल्याने सुप्रिया सुळे संतापल्या
- वारकऱ्यांसारखेच पंतप्रधान मोदींचे काम”; देवेंद्र फडणवीसांचे देहुत गौरवोद्गार
- “बंर झालं पवार साहेबांनी माघार घेतली, नाहीतर मुख्यमंत्री म्हणाले असते, तुम्ही आमचेच राष्ट्रपती”