मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देहुत शिळा मंदिराचं लोकापर्ण करण्यात आलं. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासह, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांचं भाषण संपल्यानंतर लगेच नरेंद्र मोदी यांचं नाव पुकारण्यात आलं. यावेळी मोदींनी अजित पवारांना बोलू द्या, असा इशारा करण्यात आला. मात्र अजित पवारांनी तुम्ही बोला असं करत मोदी भाषणासाठी गेले.
वारकऱ्यांसारखेच पंतप्रधान मोदींचे काम”; देवेंद्र फडणवीसांचे देहुत गौरवोद्गार
अजित पवारांना बोलु न दिल्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसने आक्रमक भूमिका भाजपवर जोरदार टिका केली. पुण्यात तसेच विविध शहरात निषेध देखील व्यक्त करण्यात आला. तर अजितदादांना भाषण न देणं हे धक्कादायक, वेदनादायक आणि महाराष्ट्राचा अपमान असल्याची टिका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यावर आता भाजपनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“बंर झालं पवार साहेबांनी माघार घेतली, नाहीतर मुख्यमंत्री म्हणाले असते, तुम्ही आमचेच राष्ट्रपती”
राष्ट्रवादी काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. भाषणे कुणाची व्हावीत आणि कुणाची नाहीत, यापेक्षा आमच्यासाठी वारकर्यांचा सन्मान अधिक महत्त्वाचा आहे. तो होतोय, याचा अधिक आनंद आहे. वारकर्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नका, ही माझी विनंती आहे. असं प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे.
आगामी वर्षात देशात 10 लाख पद भरती; नरेंद्र मोदींनी दिले प्रशासनाला आदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या शिळामंदिराचे लोकार्पण करून महाराष्ट्राचा, वारकरी परंपरेचा गौरव केला असताना काहींच्या पोटात दुखण्याचे कारण काय? वारकर्यांचा सन्मान झाला, म्हणून महाराष्ट्राच्या अपमानाचा कांगावा कशाला? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
Read also:
- मोदींसमोरच औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांनी कान टोचले, म्हणाले आता मोदी है तो..;
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर; उद्धव ठाकरेंनी मानले मोदींचे आभार
- “फडणवीसांना बोलते करून पक्षाचा प्रचार केला, मोदीजी चुक दुरूस्त करा,” अमोल मिटकरी
- अजितदादाला बोलू न देणं धक्कादायक, वेदनादायक,; अजित पवारांना देहुत भाषण करू न दिल्याने सुप्रिया सुळे संतापल्या
- अजितदादाला बोलू न देणं धक्कादायक, वेदनादायक,; अजित पवारांना देहुत भाषण करू न दिल्याने सुप्रिया सुळे संतापल्या