मुंबई : राज्यात हनुमान चालिसा वाचण्याची कोणतेही परवानगी देत नाहीत आणि तेच लोकं अयोध्यामध्ये रामाचं दर्शन करायला जात आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीतून त्य़ांना धक्का बसला असून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्यांना रामभक्त आणि हनुमान भक्त जागा दाखवून देतील, असा घणाघात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेवर केला. आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर असल्याने त्यांनी यावर भाष्य़ केले.
जे हनुमानाचे झाले नाहीत ते रामाचे काय होणार? असा सवाल करत आमदार रवी राणा यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आदित्य ठाकरे आज अयोध्येला पाप धुण्यासाठी गेले आहेत. राज्यात हनुमान चालिसाचा विरोध कशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी केला होता. ते सर्व महाराष्ट्रांनी पाहिला आहे. आम्ही काश्मिर मध्ये जाऊन हनुमान चालिसा वाचणार, परंतु तुम्ही कधी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचणार? असा खोचक सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर; उद्धव ठाकरेंनी मानले मोदींचे आभार
अयोध्येत जाऊन जी शिवसेना नौटंकी करत आहे, ते सर्वजण पाहत आहेत. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. आज अनिल देशमुख यांच्यामागे इडी लागली आहे. त्यांचा पापाचा घडा भरला असून इडी लवकरात लवकर त्यांना अटक करून शिक्षा देईल असंही रवी राणा म्हणाले आहेत.
“फडणवीसांना बोलते करून पक्षाचा प्रचार केला, मोदीजी चुक दुरूस्त करा,” अमोल मिटकरी
दरम्यान, दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत भाजप नेते नितेश राणे यांनी एक ट्विट केले आहेत. त्यात त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधताना म्हणाले की, सौ पाप करके बिल्ली म्याऊ म्याऊ करने अयोध्या चली, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शिवसैनिक यावर काय प्रतिक्रिया देणार ते आता पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “पंकजाताई माझी मोठी बहिण, कोणीही मुर्खपणा करू नये”; निलेश राणेंनी भाजपच्याच नेत्याला खडसावलं
- “फडणवीससाहेबांचा मुख्यमंत्री होण्याचा आजार फार गंभीर झालाय, त्यांना उपचाराची गरज”; रूपाली पाटील
- “नरेंद्र मोदी उत्तम नेते नसले तरी उत्तम अभिनेते”; राष्ट्रवादीची खोचक प्रतिक्रिया
- “सौ पाप करके बिल्ली म्याऊ म्याऊ करने अयोध्या चली”; नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पुन्हा डिवचलं
- “वारकर्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नका”; प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर खोचक टिप्पणी