मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीतही उमेदवारी डावल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मोठा राडा घातला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मोटार देखील अडवण्याचा प्रकार घडला. यावर पुर्वाश्रमीचे काॅंग्रेसचे सोलापुरचे जिल्हाध्यक्ष आणि भाजपमधील राणे समर्थक संतोष पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत भाष्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर; उद्धव ठाकरेंनी मानले मोदींचे आभार
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार असल्याचे सांगून पंकजा मुंडे पक्षाला नेहमीच ब्लॅकमेल करतात. वारसदार जन्माने नव्हे, तर कर्तृत्वाने ठरत असतो. याचा विचार पंकजा मुंडे यांनी केलेला दिसत नाही, असं संतोष पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच भाजपमध्ये आता दोन गट पडल्याचं चित्र निर्माण झालं असून यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी पंकजा मुंडे यांची पाठराखण केली आहे.
“फडणवीसांना बोलते करून पक्षाचा प्रचार केला, मोदीजी चुक दुरूस्त करा,” अमोल मिटकरी
पंकजा ताई माझी मोठी बहिण असून मुंडे परिवासाशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. हा मूर्खपणा कोणी करत असेल तर त्या व्यक्तीने माफी मागावी आणि परत असा मुर्खपणा करू नये, आणि ते सहन देखील केलं जाणार नाही, अशा शब्दात निलेश राणे यांनी संतोष पाटील यांना खडसावलं आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० जुलै रोजी मतदान होत आहे. भाजपने यावेळी ५ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. भाजपने पंकजा मुंडे यांना डावलून उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. तर श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.
Read also:
- “फडणवीससाहेबांचा मुख्यमंत्री होण्याचा आजार फार गंभीर झालाय, त्यांना उपचाराची गरज”; रूपाली पाटील
- “नरेंद्र मोदी उत्तम नेते नसले तरी उत्तम अभिनेते”; राष्ट्रवादीची खोचक प्रतिक्रिया
- “सौ पाप करके बिल्ली म्याऊ म्याऊ करने अयोध्या चली”; नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पुन्हा डिवचलं
- “वारकर्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नका”; प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर खोचक टिप्पणी
- मोदींसमोरच औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांनी कान टोचले, म्हणाले आता मोदी है तो..;