मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काल इडीने काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची जवळपास 10 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे. त्याआधी काॅंग्रेसने भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात आक्रमक भुमिका घेतली होती. त्यामुळे विरोधी पक्षाला दडपण्याचा प्रकार भाजप करीत असल्याचा आरोप होत आहे. यावर आता काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला आहे.
“सौ पाप करके बिल्ली म्याऊ म्याऊ करने अयोध्या चली”; नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पुन्हा डिवचलं
मागील काही वर्षात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर इडीच्या कारवाया वाढल्या होत्या. त्यावेळी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी देत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये आल्यावर इडीची चौकशी होत नसल्याने रात्रीची चांगली झोप लागते, असं धक्कादायक वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केलं होतं. तेव्हा भाजपवर सत्ताधारी पक्षांकडून जोरदार टिका करण्यात आली होती. आता यावरून सचिन सावंत यांनी भाजपने हर्षवर्धन पाटलांना ब्रॅंड अॅंबॅंडिसडर करावे असं म्हटलं आहे.
“वारकर्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नका”; प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर खोचक टिप्पणी
राहुल गांधी यांची तिसऱ्या दिवशीही चालू ठेवलेल्या चौकशीतून ED चे अधिकारी भाजपच्या शीर्ष नेत्यांचा विखार शमवत आहेत. अत्याचार करणारे सत्ताधीश घाबरट असतात. त्यांना सत्ता जाईल याची भिती असते. असो, भाजपने हर्षवर्धन पाटील यांना भाजपाचा ब्रँड अँबॅसिडर करावे. भाजपचे खरे स्वरूप हेच आहे. अशी टिप्पणी सचिन सावंत यांनी केली आहे.
“वारकर्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नका”; प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर खोचक टिप्पणी
दरम्यान, राहुल गांधी यांच्यावर इडीने कारवाई केल्यानंतर काॅंग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर संताप व्यक्त केला आहे. देशात ठिकठिकाणी भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे काल दिल्लीत काॅंग्रेसच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
Read also:
- “नकली हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या स्वयंघोषितांनी अयोध्येत दिसू नये हिच श्रीरामांची इच्छा”; दिपाली सय्यद
- “आदित्य ठाकरे अयोध्येला पाप धुण्यासाठी गेले”; रवी राणांचं शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
- “पंकजाताई माझी मोठी बहिण, कोणीही मुर्खपणा करू नये”; निलेश राणेंनी भाजपच्याच नेत्याला खडसावलं
- “फडणवीससाहेबांचा मुख्यमंत्री होण्याचा आजार फार गंभीर झालाय, त्यांना उपचाराची गरज”; रूपाली पाटील
- “नरेंद्र मोदी उत्तम नेते नसले तरी उत्तम अभिनेते”; राष्ट्रवादीची खोचक प्रतिक्रिया