मुंबई : राज्यसभेची निवडणूक पार पाडल्यानंतर आता १८ जूलै रोजी राष्ट्पती पदासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी विरोधी पक्ष प्रादेशिक पक्षांसोबत मोट बांधतांना दिसत आहे. अलिकडेच यासंदर्भात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांंनी राष्ट्रपतीपदासाठी प्रस्ताव ठेवला होता. मात्र राष्ट्रपती निवडणुक लढवणार नसल्याचं शरद पवारांनी अगोदरच स्पष्ट केले आहे.
“भाजपने हर्षवर्धन पाटलांना इडीसाठी ब्रँड अँबॅसिडर बनवावा”; काॅंग्रेसचा भाजपला खोचक टोला
राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारिख २९ जून आहे. त्यासंदर्भातच आज ममता बॅनर्जी, शरद पवार, माजी पंतप्रधान देवगौडा, मल्लिकार्जून खरगे, अखिलेश यादव, मेहबुबा मुक्ती, सुभाष देसाई, इ करीम, जयराम रमेश, प्रफुल्ल पटेल, टी. आर.बालू, यशवंत सिंन्हा, रणदीप सुरजेवाला, प्रियंका चतुर्वेदी, उमर अब्दुला, राजा आदि नेते बैठकीत उपस्थित होते. मात्र शरद पवारांनी साफ नकार दिला.
शरद पवारांनी नकार दिल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांचं नाव सुचवलं. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कोणला उमेदवारी देणार ते आता पहावं लागणार आहे. तसेच या निवडणुकीत एनडीचा उमेदवार शर्यतीत सर्वात पुढे आहे. त्यामुळे भाजप कुणाला संधी देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
“आदित्य ठाकरे अयोध्येला पाप धुण्यासाठी गेले”; रवी राणांचं शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
दरम्यान, आयोगाने मतदानाच्या दिवशी प्रोटोकॉल पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आमदारांच्या एकूण मतांचे मुल्य ५,४३,२३१ आहे. तर खासदारांच्या एकूण मतांचे मुल्य ५,४३,२०० आहे. दोन्ही मतदारांच्या मतांचे एकुण मूल्य १०,८६,४३१ इतकं असून एका खासदारांच्या मताचे मुल्य ७०० आहे.
Read also:
- “आता छोटे नवाब महाराष्ट्र भवनासाठी जागा मागणार, मग 2 वर्ष काय फक्त टोमण्यांमध्ये गेले का ?
- “केवळ आडनावावरून ओबीसींची खरी संख्या समजणार नाही”; छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
- “अयोध्येत महाराष्ट्र सदन होण्यासाठी योगींशी चर्चा करणार”; आदित्य ठाकरेंनी घेतलं रामलल्लाचं दर्शन
- “ठाकरे सरकारच पाण्याचे शत्रू , यांनी सिंचन योजनांचा खून केला”; फडणवीसांचा जालन्यात एल्गार
- संभाजी राजेंनी केलं मावळ्यांना ‘हे’ आव्हान; जनतेच्या मनातील बोधचिन्ह साकारणार