मुंबई : हर हर महादेव ! अब तांडव होगा ! असं ट्विट करत भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्टवादी पक्षावर निशाणा साधला आहे. मोहित कंबोज यांनी काल तीन ट्विट करत निशाणा साधला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याची चौकशी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या ईडीच्या निशाण्यावर विरोधी पक्षातील अनेक बडे नेते आहेत. काही दिवसापुर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीची चौकशी लागली होती व त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या ट्विटमुळे आता कोणत्या नेत्याची चौकशी होणार याकडे लक्ष लागले आहे.
“खातेवाटपात भाजपने शिंदेंवर लिंबू मिर्ची फिरवली?” शिवसेनेची भाजपवर जहरी टिका
माझं ट्विट सेव्ह करून ठेवा ! अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊतांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुख यांच्या भेटीला जाणार आहे. जेलवारीसाठी तयार रहा ! असं राष्ट्रवादीला इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे. यामुळे राष्ट्रवादीचा तीसरा नेता कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कंबोज यांना चौकशी कोणाची होणार आहे हे कंबोज यांना कसे माहित पडते असा सवाल उपस्थित केला आहे.
“मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला फक्त पाने पुसली”
मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा पर्दाफाश करणार आहे. भारत आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, गर्ल फ्रेंड्सच्या नावावरील गुणधर्म, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये भ्रष्टाचार केला, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी असंही ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे. याचबरोबर 2019 मध्ये परमबीर सिंग यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणाची पुन्हा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील शिंदे-फडणवीस सरकारला त्यांनी केली आहे.
नरेंद्र मोदींचा घराणेशाहीवर हल्लाबोल; लाल किल्ल्यावर मोदींचं दमदार भाषण
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. तर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचीही सीजे हाऊसमधईल पुनर्बांधणी प्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा कोणता मोठा नेता ईडीच्या निशाण्यावर आहे हे पाहणं गरजेचं आहे.
Read also
- “महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणाऱ्या गोष्टी सध्या सुरूय” सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
- लाल किल्ल्यावरून मोदींनी सांगितली ‘पंचप्राणाची’ संकल्पना; वाचा सविस्तर
- आता ‘हॅलो’ नाही तर ‘वंदे मातरम्’ म्हणायचं; खाते वाटपानंतर सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा
- “राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या अनेकांच्या फडणविसांनी सुरूवातीलाच मुसक्या आवळाल्या”
- घराणेशाहीच्या वक्तव्यावर अजित पवारांचं मोदींना सडतोड प्रत्युत्तर, म्हणाले, “बळजबरीने पदावर बसलं तर..;”