मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत बंड केला. यानंतर शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर वारंवार टीका करतान दिसत आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे दुसरे पुत्र तेजस ठाकरे यांना राजकारणात उतरवले. यावरून तेजस ठाकरे यांना राजकारणाचा कुठलाही अनुभव नाही. आतापर्यंत तेजस ठाकरे जंगलात पाल, सरडे शोधत फिरायचे. त्यांना जे काही मिळाले आहे ते केवळ ठाकरे या आडनावाच्या पुण्याईमुळे मिळत आहे, आशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे.
“नको ते व्हॉट्सअप, नको ते फेसबुक, नको ते ट्विटर”; त्या वक्तव्यावरून संजय शिरसाठांचं सारवासारव
सगळी पद ठाकरेंकडेच ठेवणार का? असा सवाल करत तेव्हा कार्यकर्त्यांनो विचार करा किती साथ द्यायची. उद्धव ठाकरे यांच्यापासून तेजस ठाकरेपर्यंत जे काही मिळाले ते केवळ ठाकरे आडनावामुळे बाकी यांचे कर्तुत्व शुन्य आहे. तेजस ठाकरे हे पाली, सरडे शोधाता शोधता राजकारणात आले आहेत. ठाकरे कुटुंब सगळी महत्त्वाची पदं स्वत:च्या कुटुंबातच ठेवते, त्यांना तिकडे बाहेरचा चालत नाही. बाकीच्यांनी फक्त खुर्ची टेबल उचलायचं काम करायचं. व्यक्ती कितीही शेंबडा असला तरी आडनाव ‘ठाकरे’ असेल तरच तो मुख्य पदावर दिसेल, अशी घाणाघाती टीका निलेश राणेंनी ठाकेरेंवर केली आहे.
“उद्धव ठाकरेंबाबत चुकीचं वक्तव्य येणार नाही, भावनिकरित्या कुटुंबांशी जोडलोय”; धैर्यशीलराव माने
तेजस ठाकरे यांना फुकटात उद्धव ठाकरे यांचा मुलगा म्हणुन पद मिळेल, पण त्यांचे तेवढे कर्तुत्व नाही. उद्धव ठाकरे यांचा सुपुत्र म्हणून हा पदावर बसणार आणि उद्धव ठाकरे यांच्यबरोबर जे कार्यकर्ते आहेत ते केवळ सतरंज्या उचलणार, टेबल, खुर्ची लावणार अन् घोषणा देणार, असंही राणे म्हणाले.
“काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा खून केल्याचा गंभीर आरोप असणारा नगरसेवक राष्ट्रवादीत”
यासोबतच, कार्यकर्ते पक्षाची सर्व कामे करणार आणि पदे ठाकरे घेणार. तुमच्यावर होतात तशी ठाकरेंवर कधी केस झाली आहे का? याचा विचार करा आणि साथ किती द्यायची हे ठरवा. उद्धव ठाकरे कधीच तुमचा विचार करणार नाहीत. तुम्हालाच विचार करावा लागेल, असा सल्ला निलेश राणेंनी शिवसैनिकांना दिला आहे.
Read also
- “चंद्रशेखर बावनकुळ्यांच्या नेतृत्त्वात भाजपा मोठी झेप घेईल”; देवेंद्र फडणवीस
- “ते प्रति शिवसेना भवन बांधतील, पण त्यात देव असावा लागतो ना”; जयंत पाटलांचा शिंदेंना टोला
- “ठाकरेंना आव्हान देण्यासाठी शिंदे दादरलाच उभारणार प्रति शिवसेना भवन”
- “रात्री दोन-तीन तास झोपणारा मुख्यमंत्री मिळालाय, त्याचा उपयोग महाराष्ट्राने करून घेतला पाहिजे”
- “आता आमचे कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे, ते मला पुढे कॅबिनेट मंत्रिपद देतील”; संजय शिरसाठ