मुंबई : भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे नवीन अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज नागपूर येथे जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, रामदास तडस, डॉ. अशोक उईके, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, टेकचंद सावरकर, प्रवीण दटके, रामदास आंबटकर तसेच इतर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं.
“उद्धव ठाकरेंबाबत चुकीचं वक्तव्य येणार नाही, भावनिकरित्या कुटुंबांशी जोडलोय”; धैर्यशीलराव माने
ते पुढे बोलताना म्हणाले की, अतिशय मेहनतीने, अभ्यासाने काम करणारे चंद्रशेखर बावनकुळे आहेत. तळागाळातील कार्यकर्ता पक्षातील प्रदेशाध्यक्षपदासारख्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो, याचा आदर्श म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे . उर्जा खात्यात अतिशय चांगले काम चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. काम करण्यासाठी अतिशय कठीण असताना त्यांनी ते केले. वीज मंडळाच्या तिन्ही कंपन्या नुकसानीतून बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. हे करताना सामान्य शेतकर्यांना वीज मिळेल, हेही सुनिश्चित केले.
“काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा खून केल्याचा गंभीर आरोप असणारा नगरसेवक राष्ट्रवादीत”
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात निश्चितपणे भाजपा मोठी झेप घेईल. अडीच वर्षांचा काळ वाया गेला आहे. आता उर्वरित अडीच वर्षांत 5 वर्षांचे काम करायचे आहे. शेतकर्यांना दुप्पट मदत करण्याचा निर्णय आता आपण घेतला आहे. इतरही विविध प्रकारची मदत देणार, असंही फडणवीस म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणाची भूमिका जोरदार पण मांडून धरली. तसेच याचा फायदा व्हावा म्हणून त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आल्याचं समजत आहे.
“आता गावोगावी गुलाल उधळणार, 608 ग्रामपंचायतींमध्ये जनता सरपंच निवडणार” निवडणुका जाहीर
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आलं. तसेच मुंबई शहाराचे अध्यक्ष पद आशिष शेलार यांच्याकडे सोपवण्यात आलं. मंगलप्रभात लोढा यांना देखील कॅबिनेट पदाची संधी दिल्यानंतर हा पद रिक्त होता.
Read also
- “ते प्रति शिवसेना भवन बांधतील, पण त्यात देव असावा लागतो ना”; जयंत पाटलांचा शिंदेंना टोला
- “ठाकरेंना आव्हान देण्यासाठी शिंदे दादरलाच उभारणार प्रति शिवसेना भवन”
- “रात्री दोन-तीन तास झोपणारा मुख्यमंत्री मिळालाय, त्याचा उपयोग महाराष्ट्राने करून घेतला पाहिजे”
- “आता आमचे कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे, ते मला पुढे कॅबिनेट मंत्रिपद देतील”; संजय शिरसाठ
- “नको ते व्हॉट्सअप, नको ते फेसबुक, नको ते ट्विटर”; त्या वक्तव्यावरून संजय शिरसाठांचं सारवासारव