मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. आता खडाजंगीमध्ये आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उडी घेत अशोक चव्हाण यांना जोरदार टोला लगावला आहे.
मराठा आरक्षणासह देशभरातील इतरही राज्यांच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारने कातडी बचाव धोरण स्वीकारू नये. तर 102 व्या घटना दुरुस्ती सोबतच इंद्रा साहनी प्रकरणातील 50 टक्के आरक्षण मर्यादेच्या निवाड्याच्या फेरविचारासाठीही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले होते. यावरून आता प्रवीण दरेकरांनी टीका केली आहे.
अशोकराव,
दादांचं म्हणणं खूपच लागलेलं दिसतंय. कातडी बचाव हा शब्द महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये बसतो का?जेव्हा आम्ही सत्तेत आलो,
तेव्हा आम्ही आमच्या ताकदीवर आलो,आम्ही सत्ता तुमच्यासारखी चोरून आणली नाही!— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 14, 2021
प्रवीण दरेकर म्हणाल की, अशोकराव, दादांचं म्हणणं खूपच लागलेलं दिसतंय. कातडी बचाव हा शब्द महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये बसतो का? जेव्हा आम्ही सत्तेत आलो, तेव्हा आम्ही आमच्या ताकदीवर आलो,आम्ही सत्ता तुमच्यासारखी चोरून आणली नाही, असा जोरदार टोला दरेकरांनी लगावला आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील आणि अशोक चव्हाण यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. ‘अशोक चव्हाणांनी औकातीत राहावे’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर आता चव्हाणांनी पलटवार करत चंद्रकांत पाटलांना मानसिक उपचाराची गरज असल्याचे म्हटले आहे.
Read Also :
- ‘चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची नितांत गरज’
- चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट, मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सुचना
- ‘मराठा समाजासाठी 3 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा’
- ‘कुठून हे नग मिळतात?’ भाजप नेत्याचा व्हिडीओ शेअर करत आव्हाडांची टीका
- ‘गुणरत्न सदावर्ते नीट बोल, आमच्यात माज काढण्याची ताकद आहे’