मुंबई : महामारीमुळे बेजार झालेल्या हॉटेल-बारचालक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना, त्यांच्या क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करून देण्याच्या उद्देशाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि बार-हॉटेल-रेस्टोरंट व्यावसायिकांसाठी मदत करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, आता भाजपच्या नेत्या आणि खासदार रक्षा खडसे यांनीदेखील शरद पवारांना पत्र लिहिले असून, महामारीला रोखण्यासाठी लावलेल्या लॉकडाऊन आणि जिल्हाबंदीमुळे शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहे. शेतमालाला भाव नाही, राज्य सरकारकडून कोणतेही पॅकेज नाही. या अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून, निराशेच्या गर्तेत सापडला आहे. या दुष्टचक्रातून त्याला थोडी मोकळीक मिळावी, म्हणून आपण पाठपुरावा करावा,” अशी मागणी त्यांनी या पत्रातून पवारांकडे केली आहे.
तसेच , “ज्याप्रमाणे आपण हॉटेल आणि बारचालकांच्या मदतीला धावून आलात, त्याचप्रमाणे सामान्य शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, वाजंत्रीवाले आणि हातावर पोट असलेल्या कष्टकरी यांच्यासमोर देखील महामारीमुळे निर्माण झालेले प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी तातडीने धावून या,” असे आवाहन करत, “या काळातही शेतकरी पिके घेत होता आणि शेती व शेतीपूरक उद्योगाचं राज्य सरकारचा मुख्य आधार होता. त्यामुळे शेतकरी आणि शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर, बारा बलुतेदार, वाजंत्रीवाले आणि हातावर पोट असलेल्या कष्टकरी यांच्याकरता राज्य सरकारकडून तातडीने मदत जाहीर करण्यासाठी पाठपुरावा व्हावा,” अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
आघाडी सरकारने केलेली सरसकट घोषणा अजूनही तशीच वाऱ्यावर आहे. परंतु, शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर, बारा बलुतेदार, वाजंत्रीवाले आणि हातावर पोट असलेल्या कष्टकरी कुटुंबांचा आक्रोश महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते या नात्याने मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती त्यांनी शरद पवारांकडे केली आहे.
Read Also :
- मोदींच कौतुक करण्यासाठी केला ‘ध’ चा ‘मा’; The Guardian च केलं The Daily Guardian
- राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार
- आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत होणार निर्णय, लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवला जाण्याची शक्यता
- पत्रकार, कॅमेरामन यांना तात्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा – देवेंद्र फडणवीस
- उद्धव ठाकरेंना बारामतीची हवा जास्तच मानवलेली दिसतेय; गोड बोलणे आणि पाठीत सुरी खुपसणे