चिंचवड : पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही घटना आज (बुधवारी, दि.१२) दुपारी एक वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशन जवळ घडली.
तानाजी पवार असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे समजते. आरोपीने पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशन जवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तूलातून गोळी झाडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. पोलीस तपास करीत आहेत.
कोण आहेत बनसोडे?
हवेली विधानसभा मतदारसंघाचे विभाजन करून २००८ मध्ये पिंपरी मतदारसंघ अस्तित्वात आला. अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव. २००९ च्या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ने अण्णा दादू बनसोडे यांना उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. २०१४ ला पराभूत झाले. २०१९ ला ‘आपला कामाचा माणूस’ असा प्रचार करीत पुन्हा आमदार झाले. पक्ष तोच राष्ट्रवादी काँग्रेस. तीन वेळा ते नगरसेवक होते. वेगवेगळ्या वॉर्डांचे प्रतिनिधित्व त्यांनी महापालिकेत केले आहे. स्थायी समिती सदस्य व अध्यक्षपदही भूषविले आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांची पानटपरी होती. आता याच टपरीच्या वर त्यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. तेथून जवळच निवासस्थान आहे.
Read Also :
- आम्ही देखील पाहून घेऊ ‘सामना’चा “सामना”, पुढे कसा करायचा!
- नाना भाऊ सांगाना, आम्ही जगाव की मराव?… नेमक काय कराव?
- उद्धव ठाकरेंना बारामतीची हवा जास्तच मानवलेली दिसतेय; गोड बोलणे आणि पाठीत सुरी खुपसणे
- सामनामधून काँग्रेसला पुन्हा शालीतून जोडे, थेट वर्मावरच ठेवले बोट
- “केंद्रीय अर्थमंत्रालयाचे वित्त नियोजन एका वेगळ्याच दर्जाचे…”