मुंबई : कोरोना व्हायरस महामारीमुळे देशात मोठे संकट निर्माण झाले आहे. परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील पंतप्रधान मोदींवर सातत्याने निशाणा साधत आहे. चव्हाणांनी पंतप्रधान मोदींचा एक फोटो शेअर करत बिनकामाची मालमत्ता (NPA) असल्याचे म्हटले होते. यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्र कॉंग्रेसच्याही खिजगणतीत नसलेले पृथ्वीराज चव्हाण यांना मोदी नॉन परफॉर्मिंग असेट वाटणे स्वाभाविकच असल्याचे म्हणत, भातखळकर यांनी जोरदार टोला लगावला आहे.
महाराष्ट्र कॉंग्रेसच्याही खिजगणतीत नसलेले माजी मुख्यमंत्री @prithvrj पंतप्रधान नरेंद्र मोदींना नॉन परफॉर्मिंग असेट (NPA) म्हणाले.
UPAच्या कणाहीन पंतप्रधानांच्या काळात 2G, 4G, जिजाजी… असे अनेक 'परफॉर्मन्स' पाहिलेल्या पृथ्वीराज यांच्यासारख्या नेत्याला मोदी NPA वाटणे स्वाभाविकच.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 14, 2021
अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले की, महाराष्ट्र कॉंग्रेसच्याही खिजगणतीत नसलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदींना नॉन परफॉर्मिंग असेट (NPA) म्हणाले. UPAच्या कणाहीन पंतप्रधानांच्या काळात 2G, 4G, जिजाजी… असे अनेक ‘परफॉर्मन्स’ पाहिलेल्या पृथ्वीराज यांच्यासारख्या नेत्याला मोदी NPA वाटणे स्वाभाविकच, अशी जोरदार टीका त्यांनी केली.
— Prithviraj Chavan (@prithvrj) May 13, 2021
दरम्यान, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण सातत्याने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत. गंगा नदीत कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृतदेह वाहून आले होते, यावरून देखील त्यांनी फोटो शेअर करत भाजप नेत्यांवर टीका केली होती.
Read Also :
- अजून किती लोकांचा बळी घेणार आहात?, राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला सवाल
- … म्हणून मुंबईत दोन दिवस लसीकरण केंद्र राहणार बंद
- ‘अशोकराव, आम्ही सत्ता तुमच्यासारखी चोरून आणली नाही’
- ‘चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची नितांत गरज’
- चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट, मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सुचना
- ‘मराठा समाजासाठी 3 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा’