मुंबई : आज मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांचं उदघाटन होत असून, वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने आज पश्चिम द्रुतगती महामार्गावरील भुयारी मार्गासह मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) च्या वतीने मुंबईच्या पश्चिम उपनगरात उभारण्यात आलेल्या मेट्रो २ अ, तसेच मेट्रो ७ च्या चाचणी मार्गांचे उदघाटन करण्यात आले.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निषेधार्थ, मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपकडून, मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. “भाजपच्या काळात विकासाच्या वेगावर असलेल्या मेट्रोचे काम आधी स्वतःच्या हट्टापायी रखडवून, नंतर या प्रकल्पची किंमत वाढवून, श्रेय लाटण्यासाठी लाखो रुपये जाहिरातबाजीवर या सरकारने उधळले, असं म्हणत भाजपने आघाडी सरकारविरोधात आकुर्ली मेट्रो स्टेशनबाहेर जोरदार घोषणाबाजी देखील केली.
तसेच, या महत्वाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं नाव नसल्याने देखील भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आणि ठाकरे सरकार हेकेखोर असल्याचा आरोप करत, विरोधी पक्षनेत्याला अश्या महत्वाच्या कार्यक्रमाला न बोलावणं हा संसदीय परंपरेचा अपमान आहे,” असं म्हणत निषेध केला. त्यामुळे या परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, पोलिसांनी आमदार भातखळकर यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांना अटक केली.
Read Also :
- राज्य सरकार अतिशय दुर्बल आणि बनावटी कारणं देतं आहे
- ‘ठाकरे सरकारची माझ्यावर पाळत, हेरगिरी सुरु’ – छत्रपती संभाजीराजे
- सात वर्षे निव्वळ स्वप्ने दाखवली, पण एकही पूर्ण केलं नाही
- मुख्यमंत्र्यांची तंबी! गर्दी कराल तर याद राखा, कडक निर्बंध लावले जातील
- मराठा समाजाला आघाडी सरकारकडून मोठा दिलासा, मराठा तरुणांना मिळणार EWS मध्ये 10 % आरक्षण