मुंबई : ईडीने नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांशी संबंधित असलेल्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकार बँक कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी, ईडीची ही कारवाई असून, हा कारखाना त्यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्याशी संबंधित आहे. दरम्यान, यामुळे आता विरोधकांकडून त्यांच्यावर हल्लाबोल केला जात असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मोठी बातमी : वारकरी सांप्रदायातील अग्रणी कीर्तनकार बंडातात्या कराडकर नजरकैदेत
आज प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “५४ कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करण्यासंदर्भात आज अमित शाह यांना पत्र लिहिणार असून, यामध्ये संबंधित असलेल्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, मग ते भाजपचे नेते असले तरीही त्यांचीसुद्धा चैाकशी व्हायलाच पाहिजे. यासंबंधी मी पत्र लिहू नये, हीच तर अजित पवार यांची हुकूमशाही आहे. त्यांनी आमच्या सरकारच्या काळातील प्रकरणं असतील तर काढावी, आम्ही कुणालाही अडवलेलं नाही,” असं म्हटलं आहे.