पुणे : अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर ११ हजार ४० मतांनी विजय मिळवला आहे. तब्बल २८ वर्षाचा भाजपचा हा बाल्लेकिल्ला रवींद्र धंगेकरांनी उद्धवस्त केला असून भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. खास करून कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे कॅबिनेट मंत्री पुण्यात ठाण मांडून बसले होते. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे या पोटनिवडणुकीचा परिणाम आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता आहे.
“कसबा मतदारसंघात दरवेळी तिरंगी लढत व्हायची यंदा पहिल्यांदाच दोन जणांमध्ये थेट लढत झाली. मतदारांपर्यंत पोहचण्यात मी अपयशी ठरलो. मला या निवडणुकीच्या निकालाचं आत्मचिंतन करून कुठे कमी पडलो हे पाहावे लागेल. कुठलीही निवडणूक नेते गांभीर्याने घेत असतात.निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे, जिथे आम्ही कमी पडलो तिथे काम करू.”अशी प्रतिक्रिया हेमंत रासने यांनी दिली आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुक मतमोजणी
तिसरी फेरी
रवींद्र धंगेकर ११,१५७
हेमंत रासने १०,६७३
आनंद दवे १२
चौथी फेरी!
रवींद्र धंगेकर १४८९१
हेमंत रासने १४३८२
आनंद दवे १००
पाचवी फेरी
रवींद्र धंगेकर १९०२०
हेमंत रासने १७०५३
आनंद दवे १००
सातवी फेरी
रवींद्र धंगेकर २५,९०४
हेमंत रासने २४,६३३
आनंद दवे १००
आठवी फेरी
रवींद्र धंगेकर ३०,५३७
हेमंत रासने २७,१८७
आनंद दवे १००
नववी फेरी
रवींद्र धंगेकर ३४,७७८
हेमंत रासने ३०,२७२
आनंद दवे १००
दहावी फेरी
रवींद्र धंगेकर ३८,२६३
हेमंत रासने ३४,०३६
आनंद दवे १००
अकरावी फेरी
रवींद्र धंगेकर ४११८८
हेमंत रासने ३७९५५
आनंद दवे १००
बारावी फेरी
रवींद्र धंगेकर ४५,६३८
हेमंत रासने ४०,७६१
आनंद दवे १२१
तेरावी फेरी
रवींद्र धंगेकर ४९,१२०
हेमंत रासने ४४,०३४
आनंद दवे १२१
चौदावी फेरी
रवींद्र धंगेकर ५२८३१
हेमंत रासने ४७५४६
पंधरावी फेरी
रवींद्र धंगेकर ५६,४९७
हेमंत रासने ५०,४९०
आठरावी फेरी
रवींद्र धंगेकर ६७,९५३
हेमंत रासने ५८,९०४
Read also
- हेही वाचा..“कसब्यात ‘रविंद्र धंगेकर’ तर चिंचवडमध्ये ‘अश्विनी जगताप’ आघाडीवर”, पोटनिवडणुकांचा कल हाती
- हेही वाचा..““कसब्यात ‘रविंद्र धंगेकर’ तर चिंचवडमध्ये ‘अश्विनी जगताप’ आघाडीवर”, पोटनिवडणुकांचा कल हाती
- हेही वाचा..“गुरूवारी कोर्टात ठाकरेंना शिंदेंकडून वकिल धक्का देणार, महेश जेठमलानी मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद गेम चेंजर ठरणार
- हेही वाचा..राऊतांच्या विरोधात हक्कभंगाची समिती, भाजपसह, काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश, ४८ तासांची मुदत
- हेही वाचा..तर संजय राऊतांना कारावासाची शिक्षा होऊ शकते, राऊतांच्या वक्तव्यावर वकील ‘असीम सरोदे’ यांचं सुचक विधान