मुंबई : विधीमंडळ नव्हे चोरमंडळ असं म्हटल्यानंतर खासदार संजय राऊतांना तात्काळ अटक करा, अशी मागणी भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. त्याआधी विधानसभेच्या सभागृहात देखील सत्ताधारी आमदारांनी संजय राऊतांच्या विरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सभागृह दोन ते तीन वेळा सभागृह तहकुब करण्याचा निर्णय घेतला. तर विधान परिषदेच्या सभागृहात राऊतांच्या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला.
हेही वाचा..सहानुभूतीची लाट अश्विनी जगतापांच्या पाठीशी, चिंचवड भाजपच्या ताब्यात, एक्झिट पोल काय सांगतंय?
महाराष्ट्रातील विधानमंडळ देशातील सर्वोत्तम विधान मंडळ म्हटलं जातं. पण विधान मंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार दिला तर मग या विधानमंडळावर कुणाचा विश्वास राहणार नाही. आपल्याला हक्कभंग आयुध दिलं कशासाठी? न्यायालयाच्या विरोधात बोलल्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतं. उद्दा आपल्या बाजूने न्याय नाही आला म्हणून कुणी कोर्टाविरोधात बोललं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतो. तसेच विधान मंडळावर कोणी काही बोलू नये म्हणून हक्कभंगाची व्यवस्था केली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
हेही वाचा..“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा फिनिक्स भरारी घेईल”
विधीमंडळाला चोरमंडळ म्हणणं योग्य नाही. एका मोठ्या सभागृहाचे नेते असं वक्तव्य करीत असतील तर ते योग्य नाही. त्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याचा अधिकार सभापती यांना आहे. परंतु यावर आपण काहीच कारवाई केली नाही. तर उद्या हजारो संजय राऊत तयार होऊन या विधीमंडळाला रोज चोर म्हणतील. रोज ते या विधानमंडळाचा अपमान करतील. तसेच तुम्ही आम्हाला चोर म्हणत असतील तर तुमचे नेते उद्धव ठाकरे देखील याच सभागृहाचे सदस्य आहे. मग ते पण चोर आहेत का ? असा सवालही त्यांनी केला.
Read also
- हेही वाचा..जब महंगाई नही बढ़ी थी, तब लड़ी थी, आज एलपीजी की किमत सताती है, स्मृतीजी की बहुत याद आती है!
- हेही वाचा..“ठाकरेंच्या वकिलांचे मुद्दे शिंदेंच्या वकिलांनी खोडून काढले,” उद्या सत्ता संघर्षावर अंतिम सुनावणी
- हेही वाचा..““नव्या लुकमध्ये केंब्रिजमध्ये पोहचले राहुल गांधी,” ‘या’ विषयावर देणार व्याख्यान, काॅंग्रेसने मोदींना डिवचलं
- हेही वाचा..““..तर उद्या हजारो संजय राऊत तयार होऊन या विधीमंडळाला रोज चोर म्हणतील”, सभागृहात देवेंद्र फडणवीस आक्रमक
- हेही वाचा..“एकीकडे सत्तासंघर्ष, तर दुसऱ्या बाजूला काॅंग्रेस अन् शिवसेनेत वाद”,खैरेंनी धानोरकरांना थेट इशाराच दिला