पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी २६ फेब्रुवारी मतदान झालं असून त्याचा निकाल उद्या २ मार्चला लागणार आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांच्यात लढत आहेत. यातच एका संस्थेच्या एक्झिट पोलनुसार कसब्यात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा..“एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना मोठा दणका, ‘या’ पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू”
पुण्यातील या दोन्ही पोटनिवडणुकीसंदर्भात द स्ट्रेलेमा या संस्थेने आपला एक्झिट पोल प्रसिद्ध केला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अश्विनी जगताप यांना १,२५,३५४ मत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ९३,००३ तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ६०,१७३ मत पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अश्विनी जगताप या पोटनिवडणुकीत ३२,३५१ मतांनी विजय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा..“.“तर मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजाचं, पुण्याला फुलेंच तर नागपुरला आंबेडकरांच नाव द्या,” खासदाराची मागणी
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतरही चिचंवड भाजपच्या ताब्यात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. मागील दहा वर्ष लक्ष्मण जगताप यांनी या मतदारसंघात लोकप्रतिनिधी म्हणून कामे केली आहेत. त्यामुळे चिंचवडमधील जनता जगतापांच्या पाठीशी असल्याचा अंदाज द स्ट्रेलेमा या संस्थेने वर्तवलेल्या एक्झिट पोलनुसार सांगण्यात आला आहे.
हेही वाचा..“गिरीश महाजन राहिले असते तर त्या वळूला पकडलचं असतं,” भुजबळ मुद्यांवर बोलून गेले
दरम्यान, दुसरीकडे कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ७४,४२८ इतकं मत तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना ५९,३५१ मत पडण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे. या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा जवळपास १५,०७७ मतांनी विजय होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Read also
- “उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा फिनिक्स भरारी घेईल”
- हेही वाचा..““विधीमंडळ नव्हे चोरमंडळ, राऊतांच्या वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ “,राऊतांवर हक्कभंगाची कारवाई?
- हेही वाचा..“पहाटेच्या शपथविधीबाबत माझ्या आत्मचरित्रात लिहिणार, तेव्हा वाचा”, अजित पवारांचं सुचक विधान
- हेही वाचा..भाजपच्या बाल्लेकिल्ल्याला धक्का बसणार, कसब्यात काॅंग्रेसचा हात देणार भाजपला मात ?
- हेही वाचा..कोकणात भाजपने शेकापचा बाल्लेकिल्ला केला ढिल्ला, 500 कार्यकर्त्यांसह माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश